IND vs NZ 3rd ODI Live Updates  Saam TV
Sports

IND vs NZ 3rd ODI : रोहित-गिलने न्यूझीलंडला धुतलं; दोघांनाही झळकावली शतकं; भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या जोडीने किवी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

Satish Daud

IND vs NZ 3rd ODI Live Updates : भारत आणि न्यूझीलंड  संघादरम्यान, तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करायला आलेल्या रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या जोडीने किवी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी उत्कृष्ट खेळ दाखवत आपआपली शतके साजरी केली. (Latest Marathi News)

रोहित शर्माने (Rohit Sharma) ८३ चेंडूत १०१ धावा कुटल्या. या खेळीत ९ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. तर शुभमन गिलने ७८ चेंडूत ११२ धावांची विस्फोटक खेळी केली. आपल्या धडाकेबाज खेळीत त्याने १३ चौकार आणि ४ षटकारांचा पाऊस पाडला.

दरम्यान, रोहित आणि शुभमन दोघेही आपआपल्या शतकानंतर बाद झाले. सलामी जोडीने दिलेल्या दमदार सुरूवातीमुळे ३० व्या षटकात टीम इंडियाची धावसंख्या २ बाद २३८ इतकी झाली होती. विराट कोहली (Virat Kohli) १९ आणि इशान किशन १ धावा बनवून मैदानावर होते.

दरम्यान, मालिकेतील पहिले २ सामने जिंकून यजमान भारतीय संघाने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. मात्र भारतीय संघासाठी आजचा सामना केवळ औपचारिकताच असला तरी आयसीसी रॅकिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे.

भारतीय संघात दोन बदल

भारताने या सामन्यात आपल्या प्लेईंग ११ मध्ये दोन बदल केले असून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे. दोघांच्या जागी उमरान मलिक आणि युजवेंद्र चहलला अंतिम अकरा मध्ये स्थान देण्यात आले आहे. तर न्यूझीलंडने संघात एक बदल केला असून वेगवान गोलंदाज शिपलीला वगळले आहे. त्याच्या जागी जेकब डफीला संघात स्थान देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT