washinton sundar twitter
क्रीडा

IND vs NZ: सुंदरचा 'मॅजिकल बॉल',भारताला नडणाऱ्या रचिनला असा दाखवला इंगा; पिचवर नेमकं काय घडलं?

Washington Sundar Clean Bowled Rachin Ravindra: भारताला नडणाऱ्या रचिन रविंद्रला वॉशिंग्टन सुंदरने क्लिन बोल्ड करत माघारी धाडलं आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला. हा निर्णय सार्थ ठरवत न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिली. सुरुवातीला २ मोठे धक्के बसले, पण रचिनने एक बाजू धरुन ठेवली होती.

रचिन रविंद्र पहिल्या कसोटीपासूनच भारतीय गोलंदाजांना नडतोय. पहिल्या कसोटीत शतकी खेळी करणाऱ्या रचिनला दुसऱ्या कसोटीतही चांगली सुरुवात मिळाली होती. फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर रोहितने फिरकी गोलंदाजी आक्रमण लावलं खरं, मात्र रचिनने फिरकी गोलंदाजांना चांगलंच खेळून काढलं. अखेर वॉशिंग्टन सुंदरच्या मॅजिकल चेंडूंवर त्याला बाद होऊन परतावं लागलं आहे.

तर झाले असे की, भारतीय संघाकडून ६० वे षटक टाकण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने रचिनला क्लिन बोल्ड केलं. फिरकी गोलंदाजांना सहज खेळून काढणाऱ्या रचिनला सुंदरने असा काही चेंडू टाकला जो त्याला कळालाच नाही.

रचिनला वाटलं की टप्पा पडून चेंडू सरळ येईल. मात्र टप्पा पडताच चेंडू फिरला आणि ऑफ स्टम्प उडवून गेला. हे पाहून रचिनलाही आश्चर्याचा धक्का बसला. आणखी एक शतक झळकावण्याच्या वाटेवर असलेला रचिन ६५ धावांवर तंबूत परतला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत ( यष्टीरक्षक), सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, रविंद्र जडेजा, आर अश्विन

न्यूझीलंड - टॉम लेथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, विल यंग, रचिन रविंद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साऊदी, एजाज पटेल, विलियम ओ'रूर्क

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार?

Akola News : मविआमध्ये ठाकरे गटाचे बंडखोरीचे संकेत, अकोला पश्चिमची जागा ठाकरे गटाला सोडण्याची मागणी

Top 10 Airports: जगातील सर्वात दिमाखदार टॉप १० विमानतळे, वाचा कोण कोणत्या देशाच्या एअरपोर्टचा समावेश!

Aditya Thackeray Net Worth: आदित्य ठाकरेंची एकूण संपत्ती किती? आकडा वाचून धक्का बसेल

Pune Police: पुण्यात नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केलं १३८ कोटी रुपयांचं सोनं

SCROLL FOR NEXT