IND vs NZ, 2nd Test twitter
Sports

IND vs NZ 2nd Test, Day 3: न्यूझीलंडचं पॅकअप! भारतासमोर जिंकण्यासाठी डोंगराइतकं आव्हान

India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाला जिंकण्यासाठी मोठ्या आव्हानाचा पाठलाग करावा लागणार आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand 2nd Test, Day 3: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात पहिल्या डावात १०३ धावांची मोठी आघाडी घेणारा न्यूझीलंड संघ दुसऱ्या डावात २५५ धावांवर ऑल आऊट झाला आहे.

यासह भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी ३५९ धावांचं आव्हान आहे. हे आव्हान जरी मोठं असलं,तरी भारतीय संघाला ही मालिका वाचवण्यासाठी हे आव्हान पूर्ण करावं लागणार आहे.

न्यूझीलंडचा डाव २५५ धावांवर आटोपला

या सामन्यातील दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा संघ १०३ धावांची मोठी आघाडी घेऊन मैदानात उतरला होता. न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना संघाचा कर्णधार टॉम लेथमने ८६ धावांची शानदार खेळी केली. डेवॉन कॉनव्हेने १७,विल यंग २३, रचिन रविंद्रने ९, डॅरील मिशेलने १८, टॉम ब्लंडेलने ४१ धावांची खेळी केली. तर ग्लेन फिलिप्स ४१ धावांवर नाबाद राहिला.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना आर अश्विनने २ गडी बाद केले. तर पहिल्या डावात ७ गडी बाद करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने दुसऱ्या डावात ४ गडी बाद केले. तर रविंद्र जडेजाने ३ गडी बाद केले. न्यूझीलंडचा दुसरा डाव अवघ्या २५५ धावांवर आटोपला.

भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी ३५९ धावांचं आव्हान

भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या २५६ धावांवर आटोपला होता. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाली होती. ही आघाडी घेत न्यूझीलंडने भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी ३५९ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

SCROLL FOR NEXT