ind vs nz 2nd T20: Hardik Pandya  SAAM TV
Sports

Ind Vs NZ 2nd T20: हार्दिक पांड्याचे एक वक्तव्य अन् पीच क्युरेटरने गमावली नोकरी; पाहा नेमकं काय झाल?

हार्दिकच्या वक्तव्यानंतर लखनौच्या पीचवरुन वाद सुरु झाला होता. यासंबंधी आता मोठी बातमी समोर येत आहे.

Gangappa Pujari

Ind vs NZ T20 Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. दुसऱ्या सामन्यातील अटीतटीच्या लढतीत विजय मिळवत टीम इंडियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. आता उद्या या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना रंगणार आहे.

त्याआधी दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात लखनौच्या खेळपट्टीवरुन बराच वाद निर्माण झाला होता. हे पीच टी ट्वेंटीसाठी योग्य नव्हते असे म्हणत हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नाराजी व्यक्त केली होती. हार्दिकच्या या वक्तत्यानंतर पीच क्युरेटरला नोकरी गमवावी लागली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हार्दिकच्या वक्तव्यानंतर लखनौच्या पीचवरुन वाद सुरु झाला. त्या संदर्भात एक मोठी अपडेट आहे. पीच क्यूरेटर सुरेंद्र कुमार यांना हटवण्यात आलं आहे. ते आता मेन ग्राऊंडच काम पाहणार नाहीत. त्यांच्याजागी संजीव अग्रवाल आता लखनौचे नवीन पीच क्यूरेटर असतील.

IPL साठी इकाना स्टेडियममधील नऊ पीचेस संजीव अग्रवाल यांच्या देखरेखीखाली बनवण्यात येतील.

क्युरेटरने मॅचसाठी दोन प्रकारच्या काळ्या खेळपट्टया एडवान्समध्ये बनवून ठेवल्या होत्या. भारतीय टीम मॅनेजमेंटने शेवटच्या क्षणी लाल पीचची डिमांड केली. त्याला फ्रेश लाल पीच बनवायला सांगितलं. अशा परिस्थितीत जी नवीन खेळपट्टी बनवली, ती चांगल्या दर्जाची विकेट नव्हती. T20 क्रिकेटसाठी ही परफेक्ट विकेट नव्हती.

दरम्यान, या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने अवघ्या ९९ धावा केल्या होत्या. त्यामुळे टीम इंडियासमोर अवघ्या १०० धावांचे लक्ष होते. मात्र तरीही भारतीय फलंदाजांना या धावा करणे कठीण झाले होते. सामन्यात भारतीय संघाने एक चेंडू बाकी असताना सहा गडी राखून विजय मिळवला. (Indian Cricket Team)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

Mahhi Vij : "तुम लोगों पर थूकती हूं..."; घटस्फोटानंतर माहीचे मित्रासोबत जोडलं नाव, संतापलेल्या अभिनेत्रीनं VIDEO केला शेअर

Nashik News: कडाक्याच्या थंडीमुळे २२ वर्षाच्या तरूणाचा मृत्यू, नाशिकमध्ये हळहळ

Wedding Shopping : आली लगीन सराई....लग्नासाठी शॉपिंग करताय? मग मुंबईतील या प्रसिध्द ठिकाणी नक्कीच जा

Historical Places In Maharashtra : अहिल्यानगरमधील 'या' किल्ल्यावर झाली इतिहासातील महत्त्वाची लढाई, लहान मुलांसोबत नक्की जा

SCROLL FOR NEXT