Ind vs NZ 2nd ODI Saamtv
Sports

Ind vs NZ ODI Series: गोलंदाजांची कमाल! अवघ्या 15 धावा अन् न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद; शमीचा जबरदस्त कॅच Video

भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचे कंबरडे मोडत निम्मा संघ तंबूत पाठवला आहे.

Gangappa Pujari

Ind Vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना रायपुरच्या वीर नारायण सिंग मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाला मात्र एकापाठोपाठ एक धक्के मिळाल्याचे दिसत आहेत. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचे कंबरडे मोडत निम्मा संघ तंबूत पाठवला आहे. (Indian Cricket Team)

भारताचे स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी मिळून रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला शानदार सुरुवात करून दिली. या दोघांनी मिळून न्यूझीलंडला 9 धावांत 3 गडी बाद केले. शमीने किवी सलामीवीर फिन ऍलन आणि डॅरेल मिशेल यांना स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवले, तर सिराजने हेन्री निकोल्सला बाद केले.

प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरूवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात भारतीय संघ वर्चस्व गाजवताना दिसला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने किवी सलामवीर फिन ऍलनला क्लीन बोल्ड केले. स्टार वेगवान गोलंदाज हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) 15 धावांवर न्यूझीलंड संघाला चौथा धक्का दिला. पंड्याने डेव्हॉन कॉनवेला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. कॉनवेने 16 चेंडूत 7 धावा केल्या.

भारतीय संघाने न्यूझीलंड संघाचा निम्मा संघ केवळ 15 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवला. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने पाचवा धक्का दिला. त्याच्या चेंडूवर किवी संघाचा कर्णधार टॉम लॅथम १७ चेंडूत एक धावा काढून झेलबाद झाला.

शमी- सिराजच्या नावावर मोठ्या विक्रमांची नोंद...

घरच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा शमी हा 15 वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तर दुसरीकडे, सिराजने 2022 पासून एकदिवसीय सामन्यांमध्ये पॉवरप्लेमध्ये 25 विकेट घेतल्या.

अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 चेंडू टाकत 782 धावा दिल्या. यावेळी त्याची सरासरी 4.71 होती. सिराजने 21.11 च्या सरासरीने 37 विकेट घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT