ind vs nz  twitter
Sports

IND vs NZ,1st Test: भारताचा फक्त ४६ धावांत खुर्दा, टीम इंडियाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम, मायदेशात माती खाल्ली

India vs New Zealand 1st Test, Day 1: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पहिल्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand 1st Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना एका पाठोपाठ एक मोठे धक्के दिले. सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे धुतला गेला. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेनुसार सामना सुरु झाला. मात्र भारताचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांवर आटोपला आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्माची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आली.

मात्र अवघ्या ९ धावांवर भारताला पहिला धक्का बसला. रोहित शर्मा अवघ्या २ धावांवर माघारी परतला. रोहित बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला विराट कोहलीही शून्यावर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिलच्या जागी संधी मिळालेल्या सरफराज खानला खातं ही खोलता आलं नाही.

सरफराज खान बाद झाल्यानंतर, रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वालने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांना २१ धावा जोडता आल्या. यशस्वी जयस्वाल १३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर रिषभ पंत २०, केएल राहुल ०, रविंद्र जडेजा ०, आर अश्विन ०, जसप्रीत बुमराह १ आणि ... धावांवर माघारी परतला. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ४६ धावांवर आटोपला. हा भारताचा तिसरा सर्वात लोवेस्ट स्कोअर ठरला आहे.

५ पेक्षा अधिक फलंदाज शून्यावर बाद

भारतीय संघातील ५ फलंदाज या डावात शू्न्यावर माघारी परतले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये केवळ ६ वेळा असं घडलंय जेव्हा भारतीय संघातील ५ पेक्षा अधिक फलंदाज शून्यावर माघारी परतले आहेत.

या डावात शून्यावर बाद होणारे फलंदाज

विराट कोहली- ० (९)

सरफराज खान- ०(३)

केएल राहुल- ० (६)

रविंद्र जडेजा - ० (६)

आर अश्विन - ०(१)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

Police Transfer : पोलिस दलात मोठा फेरबदल, ३९ पोलिसांची तडकाफडकी बदली; नावं अन् धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT