India vs England Semifinal BCCI
Sports

मुंबईत मिळणार फायनलचे तिकिट; उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत? वाचा संपूर्ण वेळापत्रक

India vs England Semifinal : संजू सॅमसनच्या ९७ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर ५ विकेटने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. आता भारताचा सामना इंग्लंडशी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार असून फायनलचे तिकीट कोण मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Namdeo Kumbhar

संजू सॅमसनच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ५ विकेटने पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीचे तिकिट निश्चित केले आहे. वेस्ट इंडिजचे उपांत्य फेरतील आव्हान संपुष्टात आले आहे. सुपर ८ फेरीमध्ये दक्षिण आफ्रिका, भारत हे दोन संघ अ गटातून उपांत्य फेरीमध्ये पोहचले आहेत. तर ब गटातून इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघांनी उपांत्य फेरीचे तिकिट मिळवले आहे. ४ मार्च आणि ५ मार्च रोजी उपांत्य फेरीचा सामना होणार आहे.

४ मार्च रोजी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला उपांत्य फेरीचा सामना कोलकातामधील इडन गार्डन मैदानावर रंगणार आहे. तर ५ मार्च रोजी, भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर दुसरा उपांत्य सामना होईल. उपांत्य फेरीतील विजेता संघ रविवारी, ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी लढणार आहेत.

सहाव्यांदा उपांत्य फेरीत -

२००७ मध्ये टी२० विश्वचषकाची दणक्यात सुरूवात झाली होती. तेव्हापासून २०२६ च्या विश्वचषकापर्यंत भारतीय संघ सहाव्यांदा उपांत्य फेरीत पोहचला आहे. टीम इंडियाने २ वेळा टी२० विश्वचषकावर नाव कोरले आहेत. तर २०१६ मध्ये भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५ आणि २०१७ मध्ये भारताने टी२० विश्वचषक जेतेपदावर नाव कोरले.

संजू सॅमसनची निर्णायक खेळी -

वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघापुढे १९६ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरदाखल भारतीय संघाने ५ विकेटच्या मोबदल्यात हे आव्हान पार केले. टी२० विश्वचषकात भारतीय संघाकडून १९६ ही सर्वाधिक धावांचा आव्हान पाठलाग केला. संजूसॅमसन याने मोक्याच्या सामन्यात ५० चेंडूत ९७ धावांचा डोंगर उभारला. संजू सॅमसन याने पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत संयमी आणि आक्रमक फलंदाजी केली. संजू सॅमसन याने ४ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने ९७ धावांची मॅच विनिंग खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढील ७२ तास धोक्याचे! 'या' ६ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; IMD चा सर्वात मोठा इशारा

Mumbai : थरकाप उडवणारा अपघात! मुंबईत धावत्या दुचाकीवर अचानक कोसळलं नारळाचे झाड; ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Maharashtra News Live Update: मिरा-भाईंदरमध्ये नारळाचे झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू

पावसाळ्यात तुमच्याही AC मधून घाण वास येतोय? करा 'हे' सोपे काम, मिनिटांत दुर्गंधी होईल गायब

Gold Rate Today: चांदीत ₹५ हजारांची वाढ, सोन्याची किंमतही बदलली, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

SCROLL FOR NEXT