IND vs ENG Saam tv
Sports

IND vs ENG : इंग्लंडने गुडघे टेकले, सेमी फायनलमध्ये भारताने घेतला २ वर्षांपूर्वीचा बदला; आता फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेशी भिडणार

IND vs ENG Semi Final Highlights : टीम इंडिया टी२० विश्वचषकाच्या स्पर्धेत फायनलमध्ये धडकली. टीम इंडिया यशस्वीरित्या स्पर्धेच्या फायनलला पोहोचली आहे. आता टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे

Vishal Gangurde

नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया टी२० विश्वचषकाच्या स्पर्धेत फायनलमध्ये पोहोचली. टीम इंडिया यशस्वीरित्या स्पर्धेच्या फायनलला पोहोचली असून आता सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. टीम इंडियाती फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर इंग्लंडने गुडघे टेकले. सेमी फायनलमधील विजयासहित भारताने २ वर्षांपूर्वीचा बदलाही घेतला आहे.

मागील टी-२० विश्वचषक २०२२ साली सेमीफायनमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचे १० गडी बाद करून विजय मिळवला होता. इंग्लंडच्या विजयाने भारताला स्पर्धेबाहेर जावं लागलं. आता रोहित शर्माच्या ब्रिगेडचा त्याचा पराभवाचा वचपा काढत फायनलमध्ये धडक मारली आहे. दोन्ही संघात गुयानाच्या प्रोव्हिडेन्स स्टेडियममध्ये सामना झाला.

कुलदीप आणि अक्षर पटेलच्या फिरकीपुढे इंग्लंडने गुडघे टेकले

स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने इंग्लंडला १७२ धावांचं आव्हान दिलं. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंग्लंड १०३ धावांवर गारद झाली. या पराभवामुळे इंग्लंडने फायनलमध्ये धडकण्याची संधीही गमावली. इंग्लंडच्या एकही फलंदाजांनी आक्रमक खेळी दाखवली नाही.

भारतीय फिरकीपटूंनी इंग्लंडच्या फलंदाजांना फटकेबाजी करण्याची एकही संधी दिली नाही. हॅरी ब्रूक २५, कर्णधार बटलर २३, जोफ्रा आर्चरने २१, लियाम लिव्हिंगस्टोनने ११ धावा कुटल्या. या फलंदाजांव्यतिरिक्त एकही खेळाडूला दहाच्या आकड्यापर्यंत मजल मारता आली नाही. या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादव, अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. जसप्रीत बुमरहाने २ गडी बाद केले.

टीम इंडियाने नाणेफेक हरल्यानंतर ७ गडी गमावून १७१ धावा कुटल्या होत्या. कर्णधार रोहित शर्माने ३६ चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्याने ३९ चेंडूत ५७ धावांची आक्रमक खेळी खेळली. त्याने या डावात २ षटकार आणि ६ चौकार लगावले. तर सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूत ४७ धावा कुटल्या होत्या.

हार्दिक पंड्याने १३ चेंडूत २३ धावा कुटल्या. रवींद्र जडेजाने ९ चेंडूत नाबाद १७ धावा केल्या. इंग्लंडसाठी क्रिस जॉर्डनने टीम इंडियचे सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर रीस टॉप्ली, जोफ्रा आर्चर, सॅम करन आणि रशीदने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा उलटफेर; 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

MHADA House: मोठी बातमी! २३० स्क्वेअर फुटाची घरे असणाऱ्यांना १६०० स्क्वेअर फुटांचे घर मिळणार; म्हाडाचा सर्वात मोठा प्रकल्प कुठे? कोणकोणत्या सुविधा?

Heat wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट जीवावर उठली; अकोल्यात देशातील उच्चांकी तापमान

Mamata Banerjee : ममता दीदी सतत चालत का राहतात? काय आहे त्यामागचं रहस्य?

Maharashtra News Live Update: तळेगाव दाभाडेमध्ये पेट्रोल पंपावर डिझेलच्या टँकरला आग; सुदैवाने कोणतीही जीवित झाली नाही

SCROLL FOR NEXT