Mohammad Shami Saam TV
Sports

IND vs ENG : मोहमद शमीची दमदार कामगिरी; आगरकर, झहीर खानलाही टाकलं मागे

शमी भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 150 विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : टी-20 मालिका आपल्या नावावर केल्यानंतर आता भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही विजयी सुरूवात केली. मंगळवारी ओव्हल येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने तब्बल 10 विकेट्स राखून इंग्लंडचा पराभव केला. या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा (6 विकेट्स), मोहमद शमीने (3 विकेट्स) मोलाची कामगिरी केली. (IND vs ENG Cricket News)

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं सामन्यात 3 बळी घेत 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये 150 विकेट घेतल्या. दरम्यान, शमी भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 150 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. शमीने अजित आगरकर, झहीर खान सारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकत ही कामगिरी केली.

मोहमद शमी आधी वनडे सामन्यांत सर्वात जलद 150 विकेट घेणारा भारतीय अजित आगरकर होता. त्यानं 97 सामने खेळून हा विक्रम केला होता. तर झहीर खानने 103 सामन्यात 150 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, मोहम्मद शमीने 80 सामन्यांमध्ये हा टप्पा गाठून इतिहास रचला आहे.

याशिवाय कमी चेंडूत 150 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहमद शमी हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. मिचेल स्टार्कने हा टप्पा गाठण्यासाठी 3917 चेंडू घेतले. तर अजंता मेंडिसने 4053 चेंडूत हा विक्रम केला. शमीने 4071 चेंडूत 150 वी विकेट घेतली. (IND vs ENG News)

वनडे सामन्यात जलद 150 घेणारे वेगवान गोलंदाज

77 मिचेल स्टार्क

78 सकलेन मुश्ताक

80 मोहम्मद शमी/रशीद खान

81 ट्रेंट बोल्ट

82 ब्रेट ली

दरम्यान, पहिला सामना सहज जिंकत टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ओव्हल येथे मंगळवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा संपूर्ण संघ भारताविरुद्ध 110 धावांत गारद झाला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा रोहित शर्माचा निर्णय वेगवान गोलंदाजांनी योग्य ठरविला. यादरम्यान जसप्रीत बुमराहनं 6, मोहम्मद शमीने 3 आणि प्रसिद्ध कृष्णानं एक विकेट घेतली. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरनं 30 धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND Vs UAE : भारताने यूएईचा धुव्वा उडवला, सामना २७ चेंडूंमध्ये संपवला; टीम इंडियाची विजयी सुरुवात

Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाने महाराष्ट्राची चिंता वाढली, मुरबाडमधील ११२ पर्यटक अडकले

Nepal Protest: नेपाळमध्ये जे घडलं ते भारतातही घडेल; खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील २ आरोपींचा जामीन न्यायालयाने नाकारला

Solapur Firing : राज्यात चाललंय काय? गाणी लावण्याच्या वादातून राडा; थेट कला केंद्रात गोळीबार

SCROLL FOR NEXT