india vs england 5th test day 3 live team india got all out on 477 runs took lead of 259 runs  twitter
Sports

IND vs ENG 5th Test: पहिल्या १५ मिनिटात टीम इंडिया ऑलआऊट! रोहित- गिलच्या शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडवर २५९ धावांची आघाडी

India vs England 5th Test, Day 3:भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव ४७७ धावांवर संपुष्टात आला आहे.

Ankush Dhavre

India vs England 5th Test, Day 3 Live:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव ४७७ धावांवर संपुष्टात आला आहे. इंग्लंडने केलेल्या २१८ धावांचा प्रत्युत्तरात भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारत २५९ धावांची आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाने उभारला ४७७ धावांचा डोंगर...

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातील फलंदाजांनी दमदार कामगिरी केली.

भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने दमदार सुरुवात करत १०४ धावांची भागीदारी केली. डावाची सुरुवात करताना यशस्वी जयस्वालने ५७ धावांची खेळी केली. तर रोहित शर्माने १०३ धावांची खेळी केली. ही जोडी फुटल्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी मिळून १७१ भागीदारी केली. गिलने या डावात ११० धावा जोडल्या. (Cricket news in marathi)

सरफराज- पडिक्कलची महत्वपूर्ण भागीदारी..

या सामन्यात देवदत्त पडिक्कलला पदार्पण करण्याची संधी दिली गेली. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. त्याने देवदत्त पडिक्कलसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. त्याने या डावात ६५ धावांची खेळी केली.

तर सरफराज खानने ५६ धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवसाखेर कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही नाबाद परतले होते. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच हे दोघे बाद होऊन माघारी परतले. कुलदीप यादव ३० तर जसप्रीत बुमराह २० धावांवर बाद होऊन माघारी परतला. भारतीय संघाचा डाव ४७७ धावांवर आटोपला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

SCROLL FOR NEXT