wankhede stadium saam tv
Sports

IND vs ENG, 5th T20I: वानखेडेवर धावांचा पाऊस पडणार की गोलंदाज चमकणार? कशी असेल खेळपट्टी?

India vs England 5th T20I Pitch Report: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्याच्या थरार मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय संघाने आधीच ही मालिका ३-१ ने जिंकली आहे. मालिकेतील पाचवा सामना जिंकून भारतीय संघ ही मालिका ४-१ ने आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

यापूर्वी मालिकेतील चौथा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडला होता. या मैदानावर भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान पाचव्या सामन्यासाठी खेळपट्टी कोणाला साथ देणार? जाणून घ्या.

वानखेडेची खेळपट्टी कोणाला देणार साथ?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटच्या सामन्यातील थरार मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर ठरते. या मैदानावर हाय स्कोरींग सामने पाहायला मिळाले आहेत.

त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आणखी एक हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळू शकतो. या सामन्यातही नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. या मैदानावर यापूर्वीही धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.

कोणता संघ मारणार बाजी?

भारताने मालिकेतल ३ सामने जिंकले असले तरीदेखील इंग्लंडचा संघ मालिकेतील शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त दुसरीकडे भारतीय संघ शेवटचा सामना जिंकून मालिका ४-१ ने खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्यात भारतीय संघातील काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे इंग्लंडकडेही कमबॅक करण्याची संधी असणार आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, रिंकू सिंग, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, हर्षित राणा आणि मोहम्मद शमी.

या सामन्यासाठी अशी असू शकते इंग्लंडची प्लेइंग ११:

फिल सॉल्ट, बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टन, जेकब बीथल, जेमी स्मिथ, आदिल रशीद, साकिब महमूद, ब्रायडन कार्स आणि जोफ्रा आर्चर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT