yashasvi jaiswal  pti
Sports

IND vs ENG 3rd Test, Day 3: बॅझबॉलवर भारी पडला जयस्वाल, तिसऱ्या दिवसाअखेर भारताकडे 322 धावांची आघाडी

India vs England 2nd Test Day 3 Highlights: India vs England 2nd Test Day 3 Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील तिसरा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. सुरुवातीला गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडलं.

Ankush Dhavre

India vs England 2nd Test Day 3 Highlights:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील तिसरा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. सुरुवातीला गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडलं. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या जयस्वाल आणि गिलने दीड शतकी भागीदारी करत भारतीय संघाला मोठी आघाडी मिळवून दिली आहे. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाची धावसंख्या २ गडी बाद १९६ धावांवर पोहचली आहे. यासह भारतीय संघाने ३२२ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाची ३२२ धावांची आघाडी..

या सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघाची फलंदाजी आली त्यावेळी भारतीय संघाकडे १२६ धावांची आघाडी होती. भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्माची जोडी मैदानावर आली होती.

मात्र दोघांनाही मोठी भागीदारी करता आली नाही. सांघिक ३० धावसंख्येवर भारताला पहिला धक्का बसला. रोहित शर्मा अवघ्या १९ धावा करत माघारी परतला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलने मिळून डाव सावरला. दोघांनी मिळून दीडशतकी भागीदारी केली. यादरम्यान यशस्वी जयस्वाल १०४ धावा करत रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला. तर शुभमन गिल अजूनही ६५ धावांवर नाबाद आहे. (cricket news marathi)

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा डाव ३१९ धावांवर संपुष्टात आला आहे. इंग्लंडकडून फलंदाजी करताना बेन डकेटने सर्वाधिक १५३ धावांची खेळी केली.

तर उर्वरीत कुठल्याही फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ गडी बाद केले. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४४५ धावा केल्या. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने १३१ धावांची खेळी केली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT