team india twitter/bcci
क्रीडा

IND vs ENG 3rd Test: रोहित - जडेजाची शतकं अन् सरफराजचं अर्धशतक; टीम इंडियाने उभारली मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या

India vs England 3rd Test, 1st Inning: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या निरंजन शहा मैदानावर सुरु आहे.

Ankush Dhavre

India vs England 3rd Test, 1st Inning:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या निरंजन शहा मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत भारतीय संघाने या डावात ४४५ धावांचा डोंगर उभारला आहे.

उभारली कसोटी मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या..

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकला आणि सपाट खेळपट्टीवर इंग्लंडला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पर्वणी ठरते. मात्र इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीच्या एक तासातच भारताच्या ३ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली.

त्यानंतर रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाने मिळून डाव सावरला. दोघांनी मिळून २०० पेक्षा अधिक धावा जोडल्या. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक १३१ धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने आपल्या घरच्या मैदानावर खेळताना ११२ धावांची खेळी केली. पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत भारतीय संघाने ५ गडी बाद ३२६ धावा केल्या होत्या. (Cricket news in marathi)

दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लिश गोलंदाजांनी रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादवला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर आर अश्विन आणि पदार्पणवीर ध्रुव जुरेलने संघासाठी महत्वपूर्ण धावा जोडल्या. ध्रुव जुरेलने ४६ धावा जोडल्या. तर आर अश्विनने ३७ धावा जोडल्या.

पदार्पणवीरांची दमदार कामगिरी..

या सामन्यात सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांना पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. या दोन्ही खेळाडूंनी मिळालेल्या संधीचा दोन्ही हातांनी स्वीकार केला. सरफराजने या डावात फलंदाजी करताना ६६ चेंडूंचा सामना करत ६२ धावांची खेळी केली. जडेजाच्या चुकीमुळे तो धावबाद होऊन माघारी परतला. तर ध्रुव जुरेलने १०४ चेंडूंचा सामना करत ४६ धावा केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

SCROLL FOR NEXT