VIRAT KOHLI twitter
Sports

IND vs ENG: गिलचं शतक, कोहली- अय्यरचं विराट अर्धशतक! भारताने इंग्लंडसमोर ठेवलं भलंमोठं आव्हान

India vs England 3rd ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर जिंकण्यासाठी मोठं आव्हान ठेवलं आहे.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमधील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. भारताने या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ५० षटकअखेर ३५६ धावा केल्या आहेत. तर इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी ३५७ धावा करायच्या आहेत.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली. गेल्या सामन्यात शानदार शतकी खेळी करणाऱ्या रोहितला या सामन्यात सूर गवसला नाही.

तो १ धाव करत माघारी परतला. तर शुभमन गिलने १०२ चेंडूंचा सामना करत ११२ धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या विराटला देखील चांगली सुरुवात मिळाली होती. त्याच्याकडेही शतकी खेळी करण्याची संधी होती. मात्र तो ५२ धावा करत माघारी परतला.

श्रेयस अय्यरची बॅट देखील या सामन्यात चांगलीच तळपली. त्याने ६४ चेंडूत ७८ धावांची खेळी केली. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान दिल्या गेलेल्या केएल राहुलला ४० धावांपर्यंत मजल मारता आली. या शानदार फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाला ३५६ धावांपर्यंत मजल मारता आली.

गिल- विराटची रेकॉर्डब्रेकिंग खेळी

गिलने या डावात फलंदाजी करताना शानदार शतक झळकावलं. यासह तो अहमदाबादच्या मैदानावर तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कुठल्याही फलंदाजाला असा कारनामा करता आला नव्हता.

तसेच वनडेत सर्वात जलद २५०० धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. गिलने ५० डावात हा कारनामा केला आहे. तर दुसरीकडे विराट कोहलीच्या नावेही मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. विराट इंग्लंडविरुद्ध खेळताना ४००० धावा पूर्ण करणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारताची प्लेईंग ११ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह

इंग्लंडची प्लेईंग ११ -

जॉस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट , बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, टॉम बँटन, गस अ‍ॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT