SHUBMAN GILL twitter
Sports

Shubman Gill Record: जे कोणालाच नाही जमलं ते गिलने करुन दाखवलं! हा मोठा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच फलंदाज

India vs England 3rd ODI,Shubman Gill Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात शुभमन गिलने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Ankush Dhavre

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा सलामीवीर शुभमन गिल तुफान फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने संघाला शानदार सुरुवात करुन देत अर्धशतकी खेळी केली. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने ८७ धावा केल्या.

तर दुसऱ्या डावात त्याने ६० धावा केल्या. दरम्यान मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने सुरुवातीलाच मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

गिलने मोडला हाशिम आम्लाचा रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्ध डावाची सुरुवात करताना शुभमन गिलने शानदार सुरुवात करुन दिली. यादरम्यान गिलने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५०० धावा करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आम्लाला मागे सोडलं आहे. हाशिम आम्लाने हा रेकॉर्ड ५१ व्या डावात पूर्ण केला होता. तर गिलने हा कारनामा ५० व्या डावात करुन दाखवला आहे. हा रेकॉर्ड करत त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५०० धावा करणारे फलंदाज

५० डावात: शुभमन गिल

५१ डावात: हाशिम आम्ला

५२ डावात: इमाम उल हक

५६ डावात: विवियन रिचर्ड्स

५६ डावात: जोनाथन ट्रॉट

वनडे कारकिर्दीतील पहिल्या ५० डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

२५०३ धावा* - शुभमन गिल

२४८६ धावा - हाशिम आम्ला

२३८६ धावा - इमाम-उल-हक़

२२६२ धावा - फखर जमान

२२४७ धावा - शाय होप

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारताची प्लेईंग ११ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह

इंग्लंडची प्लेईंग ११ -

जॉस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट , बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, टॉम बँटन, गस अ‍ॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT