rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma: मुंबईचा राजा कटकमध्ये गरजला! षटकार खेचत रोहितने संपवली शतकाची प्रतीक्षा - VIDEO

Rohit Sharma Century, IND vs ENG 2nd ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने आपलं शतक पूर्ण केलंय.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामना कटकच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात हिटमॅनची हवा पाहायला मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्मा फॉर्मच्या शोधात होता. मात्र त्याला नावाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने षटकार मारत आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील ३२ वे शतक ठरले आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने टी-२० क्रिकेटला रामराम केलं आहे. तो केवळ वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळतोय. मात्र या दोन्ही फॉरमॅटमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. रोहित फॉर्मच्या शोधात होता. अखेर त्याला फॉर्म गवसला आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहितने ७६ चेंडूंचा सामना करत आपल्या वनडे कारकिर्दीतील ३२ वे शतक पूर्ण केले. या वादळी खेळीदरम्यान रोहितने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत ७ गगनचुंबी षटकार खेचले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला ३०४ धावांपर्यंत मजल मारता आली होती. इंग्लंडने भारतीय संघासमोर विजयासाठी ३०५ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानावर आली होती. दोघांनी सुरुवातीच्या षटकापासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला.

एका बाजूने रोहित तर दुसऱ्या बाजूने गिल देखील इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत होता. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. यादरम्यान गिलने ६० धावांची खेळी केली. तर रोहित मोठा फटका मारण्याच्या नादात ११९ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT