INDIA VS ENGLAND  saam tv news
Sports

IND vs ENG 1st Test: भारत- इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान पाऊस पडणार? वाचा हवामानाचा लेटेस्ट अंदाज

IND vs ENG Weather Update: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांंमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना २५ जानेवारीपासून हैदराबादच्या मैदानावर रंगणार आहे.

Ankush Dhavre

India vs England 1st Test, Weather Prediction:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २५ जानेवारीपासून हैदराबादमध्ये रंगणार आहे. या सामन्यावेळी हवामान कसं असेल? या सामन्यात पाऊस पडणार का? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट.

हैदराबादमध्ये पाऊस पडणार का?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार भारत - इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्यावेळी पाऊस पडणार नाहीं . हा सामना २५ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान खेळला जाणार आहे. या सामन्यातील एकही दिवशी पाऊस पडणार नाही. सरासरी तापमान ३२ अंश सेल्सिअस इतकं असेल.

कशी असेल खेळपट्टी?

या खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोपं आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. मात्र सामना जसजसा पुढे जाईल तसं फलंदाजी करणं कठीण होत जातं. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज हुकमी एक्के ठरतात. फिरकी गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करणं इथे सोपं नसतं. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या ४०४ आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाची धावसंख्या ३७७ इतकी राहिली आहे. तर तिसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या २०५ आणि चौथ्या डावातील सरासरी धावसंख्या १३१ इतकी आहे. (Cricket News In Marathi)

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक),आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आवेश खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT