ind vs eng X/BCCI
Sports

IND vs ENG 1st Test: हैदराबाद कसोटीत इंग्लंडचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय! अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

India vs England 1st Test Playing 11: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांंमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

India vs England 1st Test Playing 11:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून (२५ जानेवारी) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात पाहुण्या इंग्लंडने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ गोलंदाजी करताना दिसून येणार आहे.

भारतीय संघात ३ फिरकी गोलंदाज..

या सामन्यासाठी भारतीय संघात ३ फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. ज्यात आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल या गोलंदाजांचा समावेश आहे. हे तिन्ही गोलंदाज गोलंदाजीसह फलंदाजीतही मोलाचं योगदान देऊ शकतात. तसेच हैदराबाद खेळपट्टीवर हे तिन्ही गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांसाठी घातक ठरू शकतात. (Cricket News in marathi)

विराटच्या जागी राहुलला संधी..

ही मालिका सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने दोन्ही कसोटी सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्याऐवजी केएल राहुलला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं आहे. तर यष्टिरक्षक फलंदाज म्हणून केएस भरत खेळताना दिसून येणार आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी डावाची सुरुवात करताना दिसेल आणि शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येईल.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, के एल राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

इंग्लंड:

जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जॅक लीच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

Virar Local Train: धावत्या लोकलसमोर थेट रुळांवर उभा राहिला तरुण, पुढे जे घडलं ते पाहून प्रवाशांनाही बसला मोठा धक्का

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

SCROLL FOR NEXT