IND vs BAN, Weather Report Twitter
क्रीडा

IND vs BAN, Weather Report: भारत - बांगलादेश सामन्यात पाऊस ठरणार व्हिलन? हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

India vs Bangladesh Weather News: वाचा या सामन्यादरम्यान कसं असेल हवामान.

Ankush Dhavre

India vs Bangladesh Weather News:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत दमदार खेळ केला आहे. या स्पर्धेतील सुरुवातीच्या तीनही सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. आता चौथ्या सामन्यात भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे.

हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यादरम्यान कसं असेल पुण्यातील हवामान? जाणून घ्या.

या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. कारण या सामन्यादरम्यान पाऊस पडणार नाही असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दिवसाचं तापमान ३४ डिग्री सेल्सिअसच्या जवळपास असेल. तर किमान तापमान २३ डिग्री सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे. (India vs Bangladesh Weather Report)

भारत - बांगलादेशचा हेड टू हेड रेकॉर्ड.. (India vs Bangladesh Head To Head (Record)

वर्ल्डकप स्पर्धेतील दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पहिला तर दोन्ही संघ ४ वेळेस आमने सामने आले आहेत. या ४ पैकी ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. तर एका सामन्यात बांगलादेशने भारतीय संघाला पराभूत केलं आहे. २००७ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशने भारतीय संघाला पराभूत करत सर्वात मोठा उलटफेर केला होता. या पराभवामुळे भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला होता.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

असा राहिलाय दोन्ही संघातील सामन्यांचा रेकॉर्ड..

भारत विरूद्ध बांगलादेश - २००७ वनडे वर्ल्डकप - बांगलादेशचा ५ गडी राखून विजय

भारत विरूद्ध बांगलादेश -२०११ वनडे वर्ल्डकप - भारतीय संघाचा ८७ धावांनी विजय

भारत विरूद्ध बांगलादेश - २०१५ वनडे वर्ल्डकप - भारतीय संघाचा १०९ धावांनी विजय

भारत विरूद्ध बांगलादेश- २०१९ वनडे वर्ल्डकप- भारतीय संघाचा २८ धावांनी विजय (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT