ind vs ban twitter
Sports

बांगलादेशला हलक्यात घेऊन चालणार नाही.. IND vs BAN मालिकेआधी जाणून घ्या दोन्ही संघांचा रेकॉर्ड

IND vs BAN Head To Head Record: भारत आणि बांगलादेश यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. दरम्यान कसा राहिलाय या दोन्ही संघांचा रेकॉर्ड? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडीयमवर भारतीय खेळाडूंनी कसून सराव करायला सुरुवात केली आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे.

मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबर चेन्नईत, तर मालिकेतील दुसरा सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये रंगणार आहे. दरम्यान ही मालिका सुरु होण्यापूर्वी जाणून घ्या कसा राहिलाय या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

काही दिवसांपूर्वी बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाऊन आला आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानचा २-० ने धुव्वा उडवला आहे. त्यामुळे बांगलादेशला हलक्यात घेऊन चालणार नाही. दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळू शकते.

कसोटी क्रिकेटमध्ये कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड ?

भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या कसोटी मालिकांमध्ये भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. दोन्ही संघ आतापर्यंत १३ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ११ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर २ सामने हे बरोबरीत समाप्त झाले आहेत. बांगलादेशला एकही सामना जिंकता आलेला नाही.

वनडे मालिकेत असा राहिलाय रेकॉर्ड

भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ४१ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ३२ सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला ८ सामने जिंकता आले आहेत. यादरम्यान १ सामना अनिर्णीत राहिला आहे.

या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

बांगलादेश:

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, जाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन,नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्कीन अहमद, सैयद खालिद अहमद, जेकर अली अनिक, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT