India vs Bangladesh/File Photo SAAM TV
Sports

Team India : टीम इंडियाच्या सामन्याचं ठिकाण अचानक बदललं, का घ्यावा लागला हा निर्णय?

टीम इंडियाचा वनडे सामना ज्या ठिकाणी होणार आहे, ते ठिकाण अचानक बदललं आहे.

Nandkumar Joshi

Team India : भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. टी २० मालिकेनंतर आता शुक्रवारपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यानंतर पुढच्या महिन्यात भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. बांगलादेश दौऱ्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मोठा बदल झाला आहे. तिसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे.

भारत-बांगलादेश यांच्यातील तिसरा वनडे सामना ढाका येथे खेळवण्यात येणार होता. मात्र, हा सामना आता चटगावमध्ये खेळवण्यात येईल. भारतीय संघ ४ डिसेंबरपासून बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. तिसरा वनडे १० डिसेंबरला ढाका येथे होणार होता. पण बांगलादेशच्या नॅशनलिस्ट पार्टीनं त्याच दिवशी निदर्शने करणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचदिवशी एक रॅली होणार आहे. निदर्शने होणार असल्याने बांगलादेश क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव ठिकाण बदलले आहे. (Sports News)

तिन्ही सामने ढाका येथे होणार होते

बांगलादेश आणि भारत यांच्यात वनडे मालिका होणार आहे. या मालिकेत तीन सामने होणार आहेत. हे तिन्ही सामने ढाका येथे होणार होते. पण अखेरचा सामना आता चटगावमध्ये होईल. या मैदानावर एक कसोटी सामनाही होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे होईल. कसोटी मालिका १४ डिसेंबरपासून होणार आहे. (Cricket News)

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा, केएल राहुल, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, इशान किशन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, यश दयाल, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर.

कसोटी मालिकेसाठी संघ

रोहित शर्मा, रिषभ पंत, के. एस. भारत, केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT