ind vs ban twitter
Sports

IND vs BAN 2nd T20I: दिल्लीत रिंकू-रेड्डी शो! हार्दिक- रियानचा फिनिशिंग टच अन् टीम इंडिया २०० पार

India vs Bangladesh 2nd T20I Live: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरु आहे.

Ankush Dhavre

India vs Bangladesh 2nd T2OI Live Score: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, भारतीय संघाकडून नितीश कुमार रेड्डी, रिंकू सिंग आणि हार्दिक पंड्याची वादळी फलंदाजी पाहायला मिळाली आहे. या फलंदाजांच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकअखेर २२१ धावांपर्यंत मजल मारली आहे.

या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला बांगलादेशच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. भारताला सुरुवातीला मोठे धक्के बसले. मात्र त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना नितीश कुमार रेड्डी, रिंकू सिंग आणि हार्दिक पंड्या यांनी तुफान फटकेबाजी केली.

रिंकू, रेड्डीची अर्धशतकं

आपला दुसराच टी-२० सामना खेळत असलेल्या नितीश कुमार रेड्डीने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने षटकारांचा पाऊस पाडत, २७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतरही त्याने आपली आक्रमक फलंदाजी सुरुच ठेवली. शतक झळकावण्याची संधी असताना, तो ७४ धावांवर माघारी परतला.

रेड्डी बाद झाल्यानंतर रिंकू सिंगने जबाबदारी स्विकारली. त्याने २९ चेंडूत ५३ धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर शेवटी हार्दिक पंड्याने ३२ धावांची विस्फोटक खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकअखेर २२१ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड

EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता PFचे पैसे थेट ATM मधून काढता येणार, तारीख आली समोर

Meta Microsoft Layoff: मोठी बातमी! मायक्रोसॉफ्ट अन् मेटा २३,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार? कंपनी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

Mumbai Drug Party: नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी कारवाई, बॉलिवूड अभिनेत्रीला अटक

Priyadarshini Indalkar Photos: 'अगं तुझ्या एका नजरेने जीव झाला वेडापिसा' प्रियदर्शनीचे स्टायलिश फोटोशूट

SCROLL FOR NEXT