team india twitter
Sports

IND vs BAN: पहिल्या टी-२० साठी टीम इंडियाची प्लेइंग ११ ठरली? सूर्या या खेळाडूंना देणार संधी

Team India Playing XI Prediction: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या टी-२० साठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारतीय संघाने कसोटी मालिकेत बांगलादेशला २- ० ने धूळ चारली. ही मालिका झाल्यानंतर आता दोन्ही संघ ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. कसोटी मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेृतृत्व करताना दिसून आला होता.

आता सूर्यकुमार यादव आता टी-२० मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. दरम्यान मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

अशी असू शकते सलामी जोडी

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला देखील स्थान देण्यात आलं आहे. जयस्वाल आणि गिलच्या अनुपस्थितीत हे दोघेही डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात. तर कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. तर हार्दिक पंड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार हे निश्चित आहे.

यासह हर्षित राणा आणि मयांक यादव यांचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे. या दोघांपैकी एकाला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते. तर फिरकीपटू म्हणून रवी बिश्नोईला संधी मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे. मात्र सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि वरुण चक्रवर्तीपैकी कोणाला संधी देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नीतीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT