team india twitter
Sports

IND vs BAN: मयांकसह या खेळाडूंना मिळणार पदार्पणाची संधी; सूर्यकुमार यादव कोणाला बसवणार?

Team India Playing XI Prediction For IND vs BAN 1st T20I: भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी कशी असेल प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

IND vs BAN, 1st T20I: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना ग्वालियरमध्ये रंगणार आहे. या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे.

ज्या खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे, अशा खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात ३ युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

मयांक यादवला पदार्पणाची संधी मिळणार?

आयपीएल २०२४ स्पर्धेत सर्वात चर्चेत राहिलेला गोलंदाज म्हणजे मयांक यादव. आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत आलेल्या मयांक यादवने आयपीएल २०२४ मध्ये त्याने स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड नोंदवला होता. मात्र त्यानंतर त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर राहावं लागलं होतं. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडू फॉर्ममध्ये असण्यासह फिट असणंही तितकंच महत्वाचं असतं.

मात्र मयांक यादवच्या बाबतीत उलट घडलंय. दुखापतग्रस्त होऊन संघाबाहेर झाल्यानंतरही त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलंय. याचं एकमेव कारण म्हणजे, त्याची वेगवान गोलंदाजी. बांगलादेशविरुद्धची टी-२० मालिका, ही मयांक यादवची चाचणी घेण्याची सुवर्णसंधी असणार आहे. मयांक यादवसह नीतीश कुमार आणि हर्षित राणा यांना देखील भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

अभिषेक शर्माकडे सुवर्णसंधी

यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. संघातील प्रमुख खेळाडू संघाबाहेर असल्यामुळे अभिषेक शर्माला आपलं कौशल्य दाखवण्याची संधी असणार आहे. झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने शानदार शतकी खेळी केली होती. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत तो संजू सॅमसनसोबत मिळून डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो.

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नीतीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT