Ban On Jarvo 69 twitter
Sports

Ban On Jarvo 69: मैदानात घुसखोरी करणं जार्वो ६९ च्या अंगाशी! IND vs AUS सामन्यानंतर ICC ची मोठी कारवाई

India vs Australia, World Cup 2023: मैदानात घुसखोरी करणं जार्वोच्या चांगलंच अंगाशी आलं आहे.

Ankush Dhavre

Ban On Jarvo 69:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पार पडल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २०० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आहे.

दरम्यान हा सामना सुरू होण्यापूर्वीच मैदानावर क्रिकेट चाहत्याने घुसखोरी केल्याचे पाहायला मिळाले. हा अनोळखी व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून जार्वो आहे. यापूर्वी देखील सामना सुरू असताना जार्वो मैदानात घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर आयसीसीने जार्वोवर मोठी कारवाई केली आहे.

तर झाले असे की, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही संघ मैदानावर उतरण्याच्या तयारीत होते.त्यावेळी जार्वो भारतीय संघाची जर्सी घालून मैदानावर उतरला. त्याने मैदानात जाऊन विराट कोहलीला गाठलं. विराट आणि केएल राहुलने त्याला मैदानाच्या बाहेर जाण्यास सांगितलं.मात्र तो काही बाहेर जात नव्हता. शेवटी सुरक्षारक्षक मध्ये पडले आणि त्यांनी जार्वोला मैदानाबाहेर नेलं.

लाईव्ह सामन्यात घुसखोरी करण्याची ही जार्वोची पहिली वेळ नाही. यापूर्वी जेव्हा २०२१ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता त्यावेळी देखील कसोटी सामना सुरू असताना जार्वो भारतीय संघाची जर्सी घालून मैदानावर उतरला होता. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये जार्वोने मैदानावर प्रवेश केला होता.

आता वर्ल्डकप स्पर्धेतील सामना सुरू असताना मैदानात प्रवेश करणं जार्वोला चांगलंच महागात पडलं आहे. आयसीसीने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. यापूढे तो भारतात सुरू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेतील एकही सामना पाहण्यासाठी मैदानात प्रवेश करू शकणार नाही. आयसीसीने त्याच्यावर बंदी घातली आहे. (Latest sports updates)

मैदानात घुसखोरी करणारा जार्वो नक्की आहे तरी कोण?

कट्टर क्रिकेटप्रेमीला जार्वो ६९ हे चांगलंच लक्षात असेल. कारण डॅनियल जार्विस म्हणजेच जार्वो ६९ ने यापूर्वी देखील अनेकदा लाईव्ह सामना असताना मैदानात घुसखोरी केली आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना तो अनेकदा मैदानात घुसला होता.

एकदा तर त्याने हद्दच पार केली होती. कारण लाईव्ह सामन्यात त्याने मैदानावर येऊन इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जॉनी बेअरस्टोला धक्का मारला होता. या घटनेनंतर देखील त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT