IND vs AUS 3rd Test Live Updates Saam TV
Sports

IND vs AUS 3rd Test : तिसऱ्या कसोटीत रोहित शर्माने टॉस जिंकला; टीम इंडियात दोन मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Satish Daud

IND vs AUS 3rd Test Live Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियासाठी अतिशय प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. (Latest Sports Updates)

पहिल्या दोन कसोटीत भारताने (Team India) ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली आहे.हा कसोटी सामना जिंकून टीम इंडिया मालिकेवर कब्जा करण्यासोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही स्थान निश्चित करेल. दुसरीकडे भारताचा पराभव करून मालिकेत वापसी करण्याचा ऑस्ट्रेलिया मानस असेल.

भारतीय संघात दोन मोठे बदल

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी (India vs Australia)  टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. सतत अपयश ठरणारा सलामीवर फलंदाज केएल राहुलला अखेर डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या जागी सलामीवर म्हणून युवा शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. गोलंदाजांमध्ये वेगवाग गोलंदाज मोहमद शमीला विश्रांती देत त्याच्या जागी उमेश यादव याचा संघात समावेश करण्यात आला आहे.  (Sports News)

दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघातही मोठे बदल करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू मायदेशी परतले आहेत. पण आजच्या सामन्यात दोन महत्त्वाचे खेळाडू संघात परतले आहेत. मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीन यांची संघात एंट्री झाली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याची नाणेफेक टीम इंडियाने जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडिया प्लेईंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज  (Latest Marathi News)

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ११

उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनेमन

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT