Sports

IND vs AUS: ऋतुराज गायकवाडची झुंझार खेळी, टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाला २२३ धावांचं आव्हान

IND vs AUS cricket match update: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत २० षटकत ३ गमावून ऑस्ट्रेलियाला २२३ धावांचं आव्हान दिलं आहे.

Vishal Gangurde

India vs Australia 3rd T20I Match:

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी-२० मालिकेचा तिसऱ्या सामना सुरू आहे. या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत २० षटकत ३ गमावून ऑस्ट्रेलियाला २२३ धावांचं आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजी करताना दमदार फलंदाजी केली. टीम इंडियाने २० षटकात ३ गडी गमावून २२२ धावा केल्या. तर भारतासाठी ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक १२३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेहरेनडॉर्फ, केन रिचर्डसन आणि आरोनने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. यशस्वी जयस्वाल संघाची धावसंख्या १४ असताना तंबूत परतला. त्याने फक्त ६ धावा केल्या. ईशान किशन देखील शून्य धावांवर बाद झाला. दोघे बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव आणि ऋतुराज यादवने संघाचा डाव सावरला. पुढे सूर्यकुमार २९ चेंडूवर ३९ धावा करून बाद झाला.

सूर्यकुमार यादव बाद झाल्यावर तिलक वर्माने संघाचा डाव सावरला. तिलक आणि ऋतुराजने अर्धशतकी भागीदारी रचली. तर ऋतुराजने ३२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर ऋतुराजने ५२ चेंडूत शतक पूर्ण केलं. ऋतुराजने नाबाद १२३ धावा चोपल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT