India vs Australia 3rd odi toss update ind vs aus playing 11 virat kohli will open the innings ishan kishan and r ashwin rested Twitter
Sports

IND vs AUS 3rd ODI Live: ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय! विराट ओपनिंगला तर संघातील २ प्रमुख खेळाडू बाहेर

India vs Australia 3rd ODI Toss Update And Playing 11: पाहा कशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११

Ankush Dhavre

India vs Australia 3rd ODI Toss Update And Playing 11:

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा वनडे सामना राजकोटच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या २ सामन्यात केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून आला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने दमदार खेळ करत विजय मिळवला होता.

या सामन्यांमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली,हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली होती. आता तिसऱ्या सामन्यात हे खेळाडू कमबॅक करताना दिसून येणार आहे. (Latest sports updates)

तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. या सामन्यात ईशान किशन आणि आर अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे.

तर कर्णधार रोहीत शर्मा, विराट कोहली आणि कुलदीप यादवला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं आहे. तसेच मोहम्मद शमीला देखील या सामन्यात विश्रांती दिली गेली आहे. गेल्या सामन्यात बाहेर असलेला जसप्रीत बुमराह या सामन्यात कमबॅक करतोय. मुख्य बाब म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा या डावात ओपनिंगला येणार आहेत.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार),विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सू्र्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर,कुलदिप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bakuli Haar Designs: महाराष्ट्राचा अस्सल पारंपारिक दागिना 'बकुळी हार', लेटेस्ट 5 डिझाईन्स कोणत्या?

Maharashtra Live News Update: लव जिहाद कायदा झालाच पाहिजे - आमदार संग्राम जगताप

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण: १० वर्षानंतरही न्याय नाही, कुटुंबांनी केली इच्छामरणाची मागणी

सौरऊर्जा प्रकल्पात १२२.५८ कोटींचा मोठा फसवणूक प्रकार; 'या' चार कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल

Holi 2026 : होळी खेळण्यापूर्वी 'हे' १ काम करा, रंगाचा डागही पडणार नाही अन् चेहरा हिऱ्यासारखा चमकेल

SCROLL FOR NEXT