India vs Australia 1st odi live team india need 277 to win against Australia Mohammed Shami took 5 wickets  Twitter
Sports

IND vs AUS, 1st ODI: शमीने कांगारूंना नाचवलं! टीम इंडियाला जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज

India vs Australia Live Score: या डावात मोहम्मद शमीने भारतीय संघाकडून दमदार गोलंदाजी केली आहे.

Ankush Dhavre

IND vs AUS, 1st ODI Live Score:

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघांमध्ये वर्ल्डकपची रंगीत तालीम सुरू आहे. मोहालीच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा मान यजमान भारतीय संघाला मिळाला आहे. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने ५० षटक अखेर २७६ धावा करत भारतीय संघाला विजयासाठी २७७ धावांचे आव्हान दिलं आहे.

ऑस्ट्रेलियाने केल्या २७६ धावा..

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नरची जोडी मैदानावर आली होती. मात्र मिचेल मार्शला मोठी खेळी करता आली नाही. तो ४ धावांवर माघारी परतल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक ठोकत डाव सांभाळला.

वॉर्नरने ५२ धावांचं योगदान दिलं. तर जोस इंग्लिसने ४५ धावांचं योगदान दिलं. संघातील अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने ४१, मार्नस लाबुशेनने ३९ तर कॅमेरून ग्रीनने ३१ धावा केल्या. या डावात ऑस्ट्रेलियाने ५० षटक अखेर २७६ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

शमीने घेतल्या ५ विकेट्स..

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने या डावात १० षटक गोलंदाजी करत ५ गडी बाद केले. यादरम्यान त्याने ५१ धावा खर्च केल्या. शमीने मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोईनिस, मॅट शॉर्ट आणि सिन अबॉटला बाद करत माघारी धाडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News:पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश,राजकीय वर्तुळात खळबळ

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

जमिनीच्या व्यवहारांवर ITची नजर; 2 लाखांवरील रोखीचे व्यवहार रडारवर

SCROLL FOR NEXT