india vs afghanistan saam tv news
Sports

IND vs AFG, Super 8: अफगाणिस्तानकडून टीम इंडियाचा पराभव निश्चित? बारबाडोसमध्ये चिंता वाढवणारा राहिलाय रेकॉर्ड

India vs Afghanistan Record In Barbados: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुपर ८ फेरीतील पहिला सामना रंगणार आहे. दरम्यान कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सुपर ८ फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना बारबाडोसच्या मैदानावर होणार आहे.

भारतीय संघाने या स्पर्धेतील सलग ३ सामने जिंकत सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. हे तिन्ही सामने जिंकले असले, तरीदेखील फलंदाजी हा भारतीय संघाचा चिंता वाढवणारा विषय ठरतो. कारण विराट कोहली, रोहित शर्मा हे दोन्ही मुख्य फलंदाज आतापर्यंत फ्लॉप ठरले आहेत. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाचं टेन्शन वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.

बारबाडोसमध्ये कसा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड?

बारबाडोसमध्ये भारतीय संघाच्या पराभवाचा रेकॉर्ड हा १०० टक्के आहे. कारण भारतीय संघाने आतापर्यंत या मैदानावर २ सामने खेळले आहेत. यादरम्यान भारतीय संघाला दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. २०१० मध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाला याच मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिजने पराभूत केलं होतं. याच मैदानावर भारतीय संघाला अफगाणिस्तानचा सामना करायचा आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचे फिरकी गोलंदाज भारतीय संघाचं टेन्शन वाढवू शकतात.

भारतीय संघ १४ वर्षानंतर टी-२० वर्ल्डकपचे सामने खेळणार आहे. २०१० मध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाने अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊन भारतीय संघाला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर पुढील सामन्यात वेस्टइंडिजने भारतीय संघाला पराभूत केलं होतं.

भारतीय संघाचे सामने कधी?

भारतीय संघाने साखळी फेरीतील ४ पैकी ३ सामने जिंकले. तर १ सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. आता सुपर ८ मध्ये भारतीय संघाचे ३ सामने अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध रंगणार आहे. हे सामने २० जून, २२ जून आणि २४ जून रोजी रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: उन्हाळ्यात टॅनिंग घालवून ग्लोईंग आणि चेहऱ्याला थंडावा हवा असेल तर ट्राय करा 'हा' फेस मास्क

Maharashtra Live News Update: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासनाचा मोठा निर्णय

Interviews Tips: इंटरव्ह्यू सुरु असताना ऑफर केलेलं पाणी का पिऊ नये? वाचा कारण

Video Viral: पॅरासेलिंगदरम्यान दोरी तुटली आणि....! बागा बीचवर धक्कादायक घटना, व्हिडीओ समोर

Gold Rate Today: महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; २२ अन् २४ कॅरेटसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा

SCROLL FOR NEXT