jasprit bumrah twitter
Sports

IND vs AFG: दिल्लीत बुमराहची हवा, अफगाणिस्तानने भारतापुढे ठेवले २७३ धावांचे लक्ष्य

India vs Afghanistan: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे.

Ankush Dhavre

India vs Afghanistan LIVE Score:

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील नववा सामना सुरू आहे. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटक अखेर २७२ धावा केल्या आहेत. तर भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २७३ धावांची गरज आहे.

शाहिदी अन् उमरजाईने ठोकली अर्धशतकं..

या सामन्यात नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला होता. सलामीवीर फलंदाज रहमनुल्लाह गुरबाजने २१ तर इब्राहीम जदरानने २२ धावा केल्या. या दोघांनी ३२ धावांची भागीदारी केली. जसप्रीत बुमराहने ही जोडी तोडत अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला. (Latest sports updates)

अफगाणिस्तानकडून कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने ८८ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक ८० धावांची खेळी केली.या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला. तर अजमतुल्लाह उमरजाईने ६९ चेंडूंचा सामना करत ६२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार आणि ४ षटकार मारले. तर भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने ४ गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT