rohit sharma with shivam dube twitter
Sports

IND vs AFG: शिवम सुंदरम् ... ! दुबेच्या अष्टपैलू खेळीनं टीम इंडियानं अफगाणिस्तानला केलं चारीमुंड्या चीत

India vs Afghanistan 1st T20I: शिवम दुबेच्या अर्धशतकी खेळीच्या आणि रिंकू सिंगच्या फिनिशिंग टचच्या बळावर भारतीय संघाने मोहालीचं मैदान मारलंय.

Ankush Dhavre

India vs Afghanistan 1st Match Result:

शिवम दुबेच्या (Shivam Dube) अर्धशतकी खेळीच्या आणि रिंकू सिंगच्या (Rinku Singh) फिनिशिंग टचच्या बळावर भारतीय संघाने मोहालीचं मैदान मारलंय. भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. (India vs Afghanistan Match Highlights)

मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी १५९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह टी -२० मालिकेत १-० ची आघाडी घातली आहे.

विजयासाठी १५९ धावांचं आव्हान..

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना नबीने सर्वाधिक ४२ धावा केल्या. तर ओमरजाईने २९ आणि कर्णधार जदरानने २५ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने २० षटक अखेर ५ गडी बाद १५८ धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मुकेश कुमार आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर शिवम दुबेने १ गडी बाद केला. (Latest sports updates)

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. कारण रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यात ताळमेळ पाहायला मिळाला नाही. त्यामुळे रोहित शून्यावर बाद होऊन माघारी परतला. तर गिलने २३ आणि तिलक वर्माने २६ धावा केल्या. त्यानंतर जितेश शर्माने ३१ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. शेवटी शिवम दुबेने नाबाद ६० धावांची खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT