rohit sharma with virat kohli yandex
Sports

IND vs SL, Rohit Sharma: रोहितची वनडे मालिकेतूनही माघार? विराट- बुमराहबाबत समोर आली मोठी अपडेट

India vs Srilanka, Team India: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.

Ankush Dhavre

भारतीय क्रिकेटमधील गंभीर पर्व सुरु झालं आहे. राहुल द्रविडनंतर भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे. येत्या २७ जुलैपासून भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये वनडे आणि टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतून गंभीर प्रशिक्षणाचे धडे गिरवताना दिसून येणार आहे. रोहितनंतर भारतीय टी-२० संघाचा कर्णधार कोण होणार? हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. दरम्यान रोहित शर्मा वनडे मालिकेत खेळताना दिसून येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरु होती की, रोहितला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून विश्रांती दिली जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता अशी माहिती समोर येत आहे की, रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत खेळताना दिसून येणार आहे. रोहित गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने क्रिकेट खेळतोय, त्यामुळे असा दावा केला जात होता की, रोहितला विश्रांती दिली जाऊन केएल राहुलकडे संघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मात्र आता रोहित श्रीलंका दौऱ्यावर खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हिंदुस्तान टाईम्सने खात्रीपूर्वक सांगितलं आहे की, रोहित श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी उपलब्ध असेल. भारतीय संघाला येत्या काही महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळायची आहे. या स्पर्धेतही रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसेल, असं वक्तव्य बीसीसीआय सचिव जय शहा यांनी केला होता. तर विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे. या दोन्ही खेळाडूंना विश्रांती दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

कधी होणार भारतीय संघाची घोषणा?

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या दौऱ्यासाठी बुधवारी भारतीय संघाची घोषणा केली जाणार होती. मात्र आता या संघाची घोषणा गुरुवारी केली जाणार आहे. या दौऱ्यासाठी संघ निवडताना निवडकर्त्यांसमोर मोठी आव्हानं असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

SCROLL FOR NEXT