Team India Squad saam tv
Sports

Ind vs Eng 3rd ODI : रोहित शर्माच्या रिटायरमेंटची चर्चा असतानाच भारतीय संघात मोठा बदल; कुणाला मिळाली संधी?

India England third odi squad change : इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्याच्या आदल्या दिवशीच भारतीय संघात महत्वाचा बदल करण्यात आला आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना १९ जुलैला लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही, अशी प्रश्नार्थक चर्चा सुरू असतानाच, भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे.

वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळं संघाबाहेर आहे. त्याच्या जागी हर्ष दुबे याचा संघात समावेश केला आहे. सुंदर याला दुसऱ्या वनडे सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तो मैदानात उतरला नाही. अखेरच्या आणि अत्यंत महत्वाच्या अशा सामन्यात तो खेळू शकणार नाही. तीन वनडे सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.

वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने महत्वाची माहिती दिली आहे. सुंदर हा इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यातून बाहेर झाला आहे. कार्डिफच्या सोफिया गार्डन्स मैदानात झालेल्या दुसऱ्या सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो मालिकेतील उर्वरित सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील उपचारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाणार आहे.

हर्ष दुबे हा अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीत तो चांगली कामगिरी करू शकतो. त्याच्यात सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत वनडे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. भारताकडून तो आतापर्यंत दोन वनडे सामने खेळला आहे. त्यात त्याने ४ विकेट्स घेतल्या आहेत. दोन्ही सामन्यांत त्याला फलंदाजीची संधी मिळालेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पहिल्या वनडेत सुंदरने झळकावलं होतं अर्धशतक

वनडे मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताने ६ विकेट राखून विजय मिळवला होता. भारताच्या विजयात वॉशिंग्टन सुंदरचा मोठा वाटा होता. अक्षर पटेलसोबत त्याने १०२ धावांची विजयी भागीदारी रचली होती. ६३ चेंडूंत त्याने ५२ धावा केल्या होत्या. तर अक्षर पटेल याने ५२ चेंडूंत ५७ धावांची खेळी केली होती. त्यामुळे सुंदरचे संघात नसणे भारताच्या दृष्टीने एक मोठा धक्का असल्याचे मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : ऑक्टोबरच्या कडक उन्हात वाढतो हाय BP चा धोका, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update: मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी

Bike engine oil: किती किलोमीटर्सनंतर बदलायचं बाईकचं इंजिन ऑईल?

Tube tyres vs tubeless tyres: ट्यूबलेस टायर आणि ट्यूब टायर यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे?

IPS Transfer : प्रशासनात मोठा बदल! ५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT