India vs England Playing 11 saam tv
Sports

Ind vs Eng : दुसऱ्या वनडेत भारताचा धक्कादायक निर्णय; मॅचविनर खेळाडू संघाबाहेर; प्लेइंग ११ कशी आहे?

India vs England 2nd ODI : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या वनडेत भारतीय संघाच्या व्यवस्थापनानं मोठा बदल केला आहे. सामन्याचं चित्र बदलून टाकण्याची क्षमता असलेल्या अष्टपैलू खेळाडूला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं नाही.

Nandkumar Joshi

इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात विजय मिळवूनही 'अस्थिरतेचे ग्रहण' लागलेल्या भारतीय संघात दुसऱ्या वनडे सामन्यासाठी आश्चर्यजनक बदल करण्यात आला आहे. भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. अडचणींचा डोंगर उभा असतानाही मधल्या फळीत येऊन सामन्याचं चित्र बदलून टाकणाऱ्या मॅचविनर खेळाडूलाच बाकावर बसवलं आहे. फलंदाज विकेटकीपर केएल राहुल याला कार्डिफ वनडेमध्ये डच्चू मिळाला आहे. त्याच्या जागी ईशान किशनला संघात स्थान दिलं आहे.

कर्णधार शुभमन गिल यानं केएल राहुलला डच्चू देण्यामागचं कारण स्पष्ट केले आहे. केएल राहुल आजारी असल्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देऊ शकलो नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात केएल राहुल हा अवघ्या एका धावेवर बाद झाला होता.

वेगाने धावा करण्याची क्षमता असलेल्या ईशान किशनला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली आहे. सलामीला किंवा वनडाउनला येणाऱ्या ईशानला मधल्या फळीत फलंदाजीला उतरावे लागणार आहे. ईशानला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावे लागणार आहे. ईशान किशन हा मागील वनडे मालिकेत खेळला होता. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने शतक झळकावले होते. लखनऊत झालेल्या वनडे सामन्यात १०५ चेंडूंवर १२५ धावा केल्या होत्या.

ईशान किशनसाठी महत्वाचा सामना

ईशान किशनसाठी हा अत्यंत महत्वाचा सामना आहे. तब्बल ३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तो विदेशी मैदानावर वनडे सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. पहिल्यांदाच तो इंग्लंडविरुद्ध वनडे सामना खेळणार आहे. तसेच इंग्लंडच्या मैदानातील त्याचा हा पहिलाच सामना असेल. आतापर्यंत ईशानने २६ डावांमध्ये १०९२ धावा केल्या आहेत. त्याची धावांची सरासरी ४५.५ असून, स्ट्राइक रेट १०० हून अधिक आहे. ईशानच्या नावावर वनडेमध्ये द्विशतक देखील आहे.

भारताची प्लेइंग ११ पुढीलप्रमाणे

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ईशान किशन, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, गुरनूर बरार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओबीसी हक्कांच्या लढ्याला नवी दिशा देण्यासाठी नागपुरात राष्ट्रीय रणनीती बैठकीला सुरुवात

PF मधून पैसे काढणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! TDS सवलतीसाठी आता भरावा लागणार नवीन फॉर्म

उकडलेली अंडी किती वेळ टिकतात? विषबाधा होऊ नये म्हणून स्टोरेज कसं करावं, वाचा टिप्स

Amla beetroot carrot juice: रिकाम्या पोटी आवळा, बीट अन् गाजराचा ज्यूस प्यायलात तर काय होईल? वाचा

Navratri Kamarband Designs : गरबा नाइटसाठी रॉयल लूक! घागरा चोळीवर ट्राय करा कंबरपट्टाचे 'हे' ७ सुंदर डिझाइन्स

SCROLL FOR NEXT