India clinches Thomas Cup 2022
India clinches Thomas Cup 2022 saam tv
क्रीडा | IPL

Thomas Cup 2022 : थाॅमस कप भारताने जिंकला; इंडोनेशियाचा दारुण पराभव

Siddharth Latkar

बँकॉक (thomas cup 2022 marathi news) : बॅडमिंटनचा विश्वकरंडक अशी छाप असणा-या थॉमस कप (Thomas Cup) बॅडमिंटन (badminton) स्पर्धेत आज (रविवार) तब्बल 73 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय पुरुषांनी सुवर्णपदक जिंकल्याने त्यांच्यावर काैतुकाच वर्षाव हाेत आहे. भारताने (india) या स्पर्धेत 3 - 0 असा बलाढ्य इंडोनेशियाचा (indoensia) पराभव करुन इतिहास रचला. थाॅमस कप जिंकणारा भारत हा सहावा देश ठरला आहे. (thomas cup 2022 latest marathi news)

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात एकेरीत लक्ष्य सेनने इंडोनेशियाच्या (indonesia) अँथनी सिनिसुका गिंटिंगवर (anthony sinisuka ginting) राेमहर्षक विजय मिळवला. दूहेरीत लढतीत सात्विकसैराज (Satwiksairaj Rankireddy) व चिराग शेट्टी (Chirag Shetty) जोडीने एहसान (Muhammad Ahsan) सुकाम्युलिजो (Kevin Sanjaya Sukamuljo) यांचा (18-21, 23-21, 21-19) असा पराभव केला.

तिसऱ्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतने (kidambi srikanth) जोनाथन ख्रिस्तीवर (21-15, 23-21) असा सरळ विजय मिळवत भारताची थाॅमस कपवर माेहाेर उमटवली. या विजयानंतर भारतीय पाठीराख्यांनी एकच जल्लाेष केला.

दरम्यान या स्पर्धेत इंडोनेशियाने आत्तापर्यंत 14 वेळा चीनने 10 वेळा, मलेशियाने पाच वेळा विजेतेपद मिळविले आहे. डेन्मार्क, जपान यांच्यासह भारताने आता या स्पर्धेत अव्वल कामगिरी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

SCROLL FOR NEXT