टाेकियाे : येथे सुरु असलेल्या टोकियो २०२० पॅरालिंपिक स्पर्धेत टेबल टेनिस क्रीडा प्रकारात भारताच्या भाविना पटेल हिने रौप्य पदक पटकाविले आहे. अंतिम सामन्यात भाविनाला चीनच्या यिंगकडून पराभव स्विकारावा लागला. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या national sports day पार्श्वभुमीवर भाविनाने मिळवलेले पदकामुळे bhavina patel wins silver in tokyo paralympics 2020 भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाविनाने टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिंपिकमध्ये इतिहास रचला आहे. पॅरालिंपिकमध्ये टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना देशाची पहिली खेळाडू ठरली आहे. भाविनाला सुवर्णपदक जिंकण्याची संधी हाेती मात्र अंतिम फेरीत चीनच्या यिंगने तिला सरळ सेटमध्ये पराभूत केले.
सुमारे १९ मिनिटे चाललेल्या या सामन्यात भाविना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या यिंगला खेळात ताेडीस ताेड उत्तर देऊ शकली नाही. यिंगने पहिल्या सेटपासून भाविनावर दबाव आणला. यिंगने पहिला सेट ११-०७ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये यिंगची कामगिरी आणखी नेत्रदीपक होती आणि तिने दुसरा सेट ११-०५ असा जिंकला. तिसऱ्या सेटच्या सुरुवातीला भाविनाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण यिंगने आक्रमक खेळी करीत तिला ११-०६ ने नमविले.
देशाच्या राष्ट्रीय क्रीडा दिनी भाविना पटेलने मिळविलेले हे यश प्रत्येक भारतीयास प्रेरणादायी ठरले आहे. पतंप्रधान नरेंद्र माेदींसह देशातील प्रत्येक नागरिक भाविनेचे सामाज माध्यमातून काैतुक करीत आहे. तिच्या कुटुंबियांनी मिठाई वाटून आपल्या गावात आनंद व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.