अफगाणिस्तानविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसनची एन्ट्री saam Tv
Sports

India squad announced : टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला पुन्हा संधी, कुणाचं कमबॅक?

India vs Afghanistan T20 series Team India squad announcement : भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन या दोघांनाही भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे.

Nandkumar Joshi

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघाची बीसीसीआयकडून घोषणा करण्यात आली. श्रेयस अय्यर याच्यावर व्यवस्थापनाने पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तळ्यात-मळ्यात अशी स्थिती असताना, वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसनला पुन्हा संधी देण्यात आली आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी २० मालिकेला १३ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय टी २० संघाची घोषणा केली. सप्टेंबरच्या १३ तारखेपासून अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांच्या टी २० मालिकेला सुरुवात होत आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पहिला सामना होत आहे.

संघाची धुरा पुन्हा एकदा श्रेयस अय्यरकडेच असेल. विशेष बाब म्हणजे, स्फोटक फलंदाज आणि अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेल्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आले आहे. तर चॅम्पियन आणि जोरदार कमबॅक करण्याची धमक असलेल्या संजू सॅमसनवर विश्वास दाखवला असून, त्याचं संघात पुनरागमन झालं आहे.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे -

संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर - कॅप्टन, अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा - व्हाइस कॅप्टन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरूण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.

वैभव सूर्यवंशीकडं सर्वांच्या नजरा

१५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या शैलीचे जगातील महान क्रिकेटपटूही फॅन झाले. सर्वात कमी वयात त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. आता टी २० संघातही पाय रोवतो आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात त्याला स्थान देण्यात आले आहे. तो कशी कामगिरी करतो, याकडं आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलली तातडीची बैठक

भीमनवार सक्तीच्या रजेवर, मुंढेंच्या हाती सूत्रे! पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित, मध्यरात्री मोठ्या घडामोडी

Tea Leaves : फक्त १ चमचा चहापत्ती आणि केस होतील मजबूत, आठवडाभरात दिसेल चमत्कारिक फरक

ज्ञानेश कुमारांविरोधात दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत आंदोलनाचा धडाका,कधी-कधी झाले आंदोलनं?

SCROLL FOR NEXT