emrging asia cup 2023 Saam tv
Sports

Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेबाबत मोठी अपडेट आली समोर; भारत - श्रीलंका सामना रद्द! जाणून घ्या काय आहे कारण

Womens Emerging Asia Cup 2023: भारत - श्रीलंका सामना रद्द करण्यात आला आहे जाणून घ्या काय आहे कारण.

Ankush Dhavre

India vs Srilanka: वुमेन्स इमर्जिंग एशिया कप स्पर्धेतील सामने हाँगकाँग मधील टिन क्वांग रोड रिक्रिएशनच्या मैदानावर सुरु आहेत. या स्पर्धेत भारतीय महिला अ संघाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

या स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना भारतीय महिला अ संघ आणि श्रीलंका महिला अ संघांमध्ये पार पडणार होता. मात्र हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. मात्र हा महत्वाचा सामना असल्याने रिझर्व्ह डेची घोषणा केली गेली होती. त्यामुळे हा सामना आता मंगळवारी खेळवला जाणार आहे.

वुमेन्स इमर्जिंग एशिया कपबाबत मोठी अपडेट आली समोर..

वुमेन्स इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत भारतीय संघाला केवळ एक सामना खेळायला मिळाला आहे. आता सेमी फायनलच्या सामन्यात देखील पावसाने अडथाळा निर्माण केला आहे.

भारतीय महिला अ संघाचा पहिला सामना हाँगकाँग महिला अ संघाविरुद्ध पार पडला होता. या सामन्यात भारतीय महिला अ संघाने ९ गडी राखून विजय मिळवला होता. तर नेपाळ आणि पाकिस्तान संगाविरुद्व होणारे सामने हे पावसामुळे रद्द करण्यात आले होते. (Latest sports updates)

पहिल्या सामन्यात मिळवला विजय..

भारतीय महिला अ संघ १३ जून रोजी आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत एकतर्फी विजय मिळवला होता. श्रेयंका पाटील ही भारतीय संघाच्या विजयाची हिरो ठरली होती.

श्रेयंका पाटीलचा हा पहिलाच सामना होता. पदार्पणाच्या सामन्यात तिने ३ षटके गोलंदाजी केली. यादरम्यान तिने ३ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. श्रेयंका पाटीलच्या या दमदार कामगिरीच्या बळावर हाँगकाँग संघाचा डाव अवघ्या ३५ धावांवर संपुष्ठात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology Tips: ६ मूलांक असलेल्या लोकांसाठी शुभ रत्नजडित अंगठी कोणती घालावी?

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Asia Cup 2025: एशिया कपमध्ये पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान; 'या' दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना

Crime : लग्न करण्यासाठी भारतात आली अन् अनर्थ घडला, NRI महिलेची हत्या करुन जाळलं

GST New Rates : ४ दिवसात मोठा बदल, जीएसटी कपातीचं नोटिफिकेशन निघालं, वाचा कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार

SCROLL FOR NEXT