भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धच्या 'गट अ' (Group A) मधील सलामीच्या सामन्यात ६४ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ ची शानदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १७० धावां केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १०६ धावांत गारद झाला. भारताच्या या विजयात दीप्ती शर्माने मोलाची भूमिका बजावली. तिने उत्कृष्ट गोलंदाजी करत पाच बळी टिपले.
यासह हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनीही फलंदाजीत शानदार योगदान दिले. तर दीप्ती शर्माने उत्कृष्ट गोलंदाजी करत पाकिस्तानी फलंदाजांना दबावात ठेवलं आणि मोठी खेळी करण्यापासून रोखलं. भारताने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला.
या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही.५ चेंडूंत ६ धावा करून शफाली वर्मा बाद झाली. मात्र दुसऱ्या बाजूला स्मृती मंधानाने ४४ चेंडूंत ६८ धावांची धमाकेदार खेळी केली. तिने ९ चौकारांसह २ षटकारही मारले. दरम्यान, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली जेमिमाह रॉड्रिग्ज मात्र अपयशी ठरली. ती सात चेंडूंत फक्त एक धाव काढून बाद झाली.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या हरमनप्रीत कौरने ३५ चेंडूंत ३६ धावांची संथ खेळी केली. यासह रिचा घोषने १७ चेंडूंत ३४ धावा केल्या. अशाप्रकारे, भारताने २० षटकांत ६ बाद १७० धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानतर्फे गोलंदाजी करताना सादिया इक्बालने ४ षटकांत ४१ धावा देत २ बळी घेतले, तर फातिमा सनानेही २ बळी मिळवले.
भारतीय संघाने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना , पाकिस्तानच्या सलामीवीर जोडीनं शानदार सुरुवात करून दिली. सलामीवीर मुबिना अली आणि गुल फिरोज या जोडीने पहिल्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली. त्यानंतर, पाचवे षटक टाकण्यासाठी आलेल्या दीप्ती शर्माने पाकिस्तानला पहिला धक्का दिला. तिने गुल फिरोजाला बाद केले.
गुल फिरोजाने १२ धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानी संघाच्या नियमित अंतराने विकेट्स पडत राहिल्या. आणि संघाची धावसंख्या ७७ वर पोहोचली तोपर्यंत अर्धा संघ बाद झाला होता. यानंतर, भारतीय गोलंदाजांनी त्यांना पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही आणि पाकिस्तानी संघाचा डाव १७ षटकांत १०६ धावांवर गारद झाला. या सामन्यात दीप्ती शर्माने पाच बळी घेतले, तर श्री चरणीने तीन आणि शफाली वर्माने एक बळी घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.