India vs West Indies Saam Tv
Sports

IND vs WI: नाणेफीकाचा कौल विडिंजच्या बाजूने, तिलक वर्मा-मुकेश कुमारचं पदार्पण, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

India vs West Indies, 1st T20I Toss Update: नाणेफीकाचा कौल विडिंजच्या बाजूने, तिलक वर्मा-मुकेश कुमारचं पदार्पण, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

Satish Kengar

India vs West Indies, 1st T20I Toss Update: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी आणि एकदिवसीय मालिका संपल्यानंतर आजपासून 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताकडून पहिल्या T20 सामन्यात दोन खेळाडूही पदार्पण करत आहेत, ज्यामध्ये एक नाव वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचे आहे, तर दुसरे नाव युवा फलंदाज तिलक वर्माचे आहे.

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, ''आम्ही या दौऱ्यासाठी काही योजना आखल्या होत्या आणि आम्हाला पुढील वर्षी येथे विश्वचषकही खेळायचा आहे. त्यामुळे आमच्या संघातील काही खेळाडूंना येथे खेळण्याचा अनुभव आहे. मी गोष्टी सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझं लक्ष प्रोसेसवर आहे, ज्यामध्ये तुम्हाला काही अपयश देखील सापडतील.'' (Latest sports updates)

येथे दोन्ही संघांचे प्लेइंग 11

भारत: शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार. (Latest Marathi News)

वेस्ट इंडीज: काइल मेयर्स, ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT