ind vs wi saam tv
Sports

IND vs WI Head To Head Record: वेस्टइंडीजचा संघ टीम इंडियाला देणार धोबीपछाड? आतापर्यंतचा रेकॉर्ड एकदा पाहाच

IND VS WI Test Series: या सामन्यापूर्वी जाणून घ्या कसा राहिला आहे वेस्टइंडीज विरूद्ध भारतीय संघाचा रेकॉर्ड.

Ankush Dhavre

IND VS WI 1st Test: भारत विरूद्ध वेस्टइंडीज यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासुन प्रारंभ होणार आहे. या दोन्ही संघामध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. पहिला कसोटी सामना डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणार आहे.

या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे. तर अंजिक्य रहाणेकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबादारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या कसा राहिला आहे वेस्टइंडीज विरूद्ध भारतीय संघाचा रेकॉर्ड.

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज हेड टू हेड रेकॉर्ड..

भारत आणि वेस्टइंडीज हे दोन्ही संघ आतापर्यंत एकुण ९८ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने २२ वेळेस बाजी मारली आहे. तर वेस्ट इंडिजने आतापर्यंत ३० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर मालिकेतील ४६ सामने हे बरोबरीत सुटले आहेत. भारतीय संघाने २००२ नंतर एकही मालिका गमावली नाही.

भारत वेस्टइंडीज कसोटी मालिकांमध्ये भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. गेल्या २१ वर्षांत भारतीय संघाने एकही मालिका गमावली नाही. भारतीय संघाने १९७२ मध्ये पहिल्यांदा वेस्टइंडीजला धुळ चारत मालिका जिंकली होती. ही मालिका जिंकण्यापूर्वी भारतीय संघाला ५ मालिका गमवाव्या लागल्या होत्या.

भारत वेस्टइंडीज कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सुनील गावसकर: २७४९ धावा

राहुल द्रविड: १९७८ धावा

व्हीव्हीएस लक्ष्मण: १७१५ धावा

भारत वेस्टइंडीज कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

अनिल कुंबळे: ४५ गडी

इशांत शर्मा: ४१ गडी

एस वेंकटराघवन : २२ गडी (Latest sports updates)

पहिल्या कसोटी सामन्यासाठी असा आहे वेस्टइंडीजचा संघ:

क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड (उपकर्णधार), अलिक अथानाज, तेजनारिन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ डी सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, रेमन रेफर, केमार रोच, जोमेल वॉरिकन.

वेस्ट इंडिजविरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जड़ेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FDAची मोठी कारवाई; ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात १० टन पनीर, खवा जप्त

Weather Update: उन्हाच्या तडाख्यात 9 राज्यात पाऊस घालणार धुमाकूळ, कोणत्या राज्यांसाठी हवामान विभागानं दिला अलर्ट?

Gokul Election: निकाल जाहीर होताच महायुतीला दाखवला कोल्हापुरी हिसका; मुश्रीफ,नरकेंचं नाव घेत सतेज पाटील काय म्हणाले?

साठीच्या शिवसेनेला GEN Zचा चेहरा, आदित्य ठाकरे शिवसेनेचे नवे कार्याध्यक्ष?

Gokul Election: सतेज पाटलांचा नादखुळा; महायुतीच्या चार पहेलवानांना घोबीपछाड

SCROLL FOR NEXT