tilak verma saam tv
Sports

IND VS WI 4th T20: विराट कोहलीचा महारेकॉर्ड धोक्यात! पहिल्याच मालिकेत तिलक वर्माला हा मोठा रेकॉर्डची मोडण्याची संधी

Tilak Verma Record: या मालिकेत तिलक वर्माला विराट कोहलीचा एक मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

Tilak Varma Can Break Virat Kohli Record:

भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा टी-२० सामना आज अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये रंगणार आहे. आतापर्यंत झालेल्या ३ सामन्यांपैकी २ सामन्यांमध्ये वेस्टइंडीज संघाने बाजी मारली आहे. तर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने दमदार कमबॅक केले होते.

आता मालिकेतील चौथा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यात युवा भारतीय फलंदाज .युवा भारतीय फलंदाज तिलक वर्माला विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढण्याची संधी असणार आहे.

भारतीय संघातील युवा फलंदाज तिलक वर्माने या मालिकेतील सुरूवातीच्या ३ सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यांमध्ये ३९,५१ आणि नाबाद ४९ धावांची खेळी केली आहे.

आतापर्यंत त्याने या मालिकेत एकुण १३९ धावा केल्या आहेत. अजुनही या मालिकेतील २ सामने शिल्लक आहेत. या २ सामन्यांमध्ये जर त्याने ९३ धावा केल्या तर तो विराट कोहलीने २०२१ मध्ये केलेला विक्रम मोडून काढू शकतो.

विराट कोहलीने २०२१ मध्ये इंग्लंड संघाविरूद्ध झालेल्या मालिकेत २३१ धावा केल्या होत्या. द्विपक्षीय मालिका खेळताना टी-२० मालिकेत भारतीय संघाकडून या सर्वाधिक धावा आहेत. विराट कोहलीसह केएल राहुल, ईशान किशन आणि श्रेएस अय्यरने टी-२० मालिका खेळताना २०० धावांचा पल्ला गाठला आहे. (Latest sports updates)

आशिया चषक स्पर्धेत संधी मिळणार?

तिलक वर्माने नुकताच भारतीय संघासाठी पदार्पण केले आहे. दरम्यान काही सामने खेळताच त्याला वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वेस्टइंडीजविरूद्धच्या उर्वरीत २ सामन्यांमध्ये जर त्याने चांगली कामगिरी केली तर त्याला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड केली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT