ind vs SL T20 Siries Saamtv
Sports

IND vs SL : श्रीलंकेचा धावांचा डोंगर, टीम इंडियासमोर विजयासाठी २०७ धावांचं आव्हान

श्रीलंकेकडून कुशल मेंडिस आणि दासुन शनाका यांनी अर्धशतके झळकावली.

साम टिव्ही ब्युरो

IND vs SL 2nd T20: दुसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २०७ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने शानदार सुरुवात केली. यानंतर मधल्या षटकांमध्ये श्रीलंकेचा (Srilanka)  डाव गडगडला.

श्रीलंकेकडून कर्णधार दाशून शनाकाने 22 चेंडूत नाबाद 56 धावांची धडाकेबाज खेळी केली. याआधी भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातून राहुल त्रिपाठी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे.  (Indian Cricket Team)

अखेर शेवटी कर्णधार दासुन शनाकाने आक्रमक फलंदाजी करत संघाची धावसंख्या 206 धावांपर्यंत नेली. श्रीलंकेकडून कुशल मेंडिस आणि दासुन शनाका यांनी अर्धशतके झळकावली. भारताकडून उमरान मलिकने दोन बळी घेतले.

श्रीलंकेचा संघ चांगल्या ओपनिंग पार्टनरशीपनंतर डगमगताना दिसता. यादरम्यान एकापाठोपाठ विकेट्स पडल्या. पण कर्णधार शनाकाने संयमी खेळी करत संघाची धावसंख्या 200 धावांच्या पुढे नेली. दरम्यान सलामीवीर पथुम निशांकने 35 चेंडूत 33 धावा केल्या. तर कुसल मेंडिसने 31 चेंडूत 52 धावांची धडाकेबाज खेळी केली.

कर्णधार दशून शनाकाशिवाय चरिथ अस्लंकाने 19 चेंडूत 37 धावांची खेळी खेळली. भारताकडून उमरान मलिकने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर अक्षर पटेलने 4 षटकात 24 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय युझवेंद्र चहल आणि उमरान मलिक यांना 1-1 यश मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT