team india saam tv
Sports

IND vs SA: हार्दिकचं टेन्शन वाढणार! हा स्टार ऑलराऊंडर पहिल्याच सामन्यात करु शकतो पदार्पण

Ramandeep Singh Debut: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटीत स्टार भारतीय खेळाडूला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

Ankush Dhavre

IND vs SA T20I Series: भारताला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ३-० ने दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विजयासह न्यूझीलंडने इतिहास रचला आहे. यापूर्वी न्यूझीलंडने भारतात कधीच कसोटी मालिका जिंकली नव्हती.

आता कसोटी मालिकेतील पराभव विसरून भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धची टी -२० मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ८ नोव्हेंबरला ४ टी -२० मालिकेतील पहिला सामना रंगणार आहे. या मालिकेसाठी युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान एक स्टार खेळाडू असा देखील आहे, जो हार्दिक पंड्याचं टेन्शन वाढवू शकतो.

काही दिवसांपूर्वीच एमर्जिंग आशिया कप स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेत भारतीय संघाला सेमीफायलमधून बाहेर पडावं लागलं. मात्र फायनलमध्ये पोहचवण्यात रमनदीप सिंगने मोलाची भूमिका बजावली.

त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताने सेमीफायनल गाठली होती. याच दमदार कामगिरीच्या बळावर त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात जेव्हा अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मासारखे फलंदाज अडखळले त्यावेळी रमनदीप भिंतीसारखा उभा होता.

भारतीय संघाला अफगाणिस्तानविरुद्धचा सामना गमवावा लागला होता. मात्र त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या सामन्यात त्याने ६४ धावांची शानदार खेळी केली होती. मात्र भारताला विजय मिळवता आला नव्हता.

ताबडतोब फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला रमनदीप सिंग वेगवान गोलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. त्यामुळे तो हार्दिकसाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत त्याने गोलंदाजी करताना ४ सामन्यांमध्ये ३ गडी बाद केले होते. तर फलंदाजी करताना त्याने ९४ धावा कुटल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनं 1 लाखांवर? सोन्याचा दर 40 टक्क्यांनी घटणार?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या विमाना अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 तारखेपूर्वी येणार

मंत्रालयात 'कोडिंग' लाचखोरी! फाईलवरील 'दोन लाईन'चं गुपित उघड

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमान अपघातामागचं कारण समोर येणार, VSR विमान कंपनीच्या तपासण्या पूर्ण

Navi Mumbai Crime: “पोलीस ठाण्यात गेलास तर मर्डर”; खारघरमध्ये तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT