IND vs SA 2nd Test bcci x
Sports

IND vs SA: केपटाऊन विजयासाठी टीम इंडियाची जोरदार तयारी; मालिका वाचवण्यासाठी कंबर कसली

IND vs SA 2nd Test: टीम इंडिया २०२४ मधील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर होणार आहे.

Bharat Jadhav

IND vs SA 2nd Test Team India Practice Session:

केपटाऊनमधील कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू घाम गाळत आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर संघाला दोन दिवसांची विश्रांती देण्यात आली होती. कसोटी मालिकेतील दुसरा सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया कसून सराव करत आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या सराव सत्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी सराव सत्रात चांगलाच घाम गाळल्याचे दिसून येत आहे.(Latest News)

केपटाऊनमध्ये काय राहिलाय इतिहास

या मैदानावर आतापर्यंत ५९ कसोटी सामने (Test matches) खेळले गेलेत. त्यापैकी ४८ सामन्यांचे निकाल जाहीर झाले असून यातील ११ सामने अनिर्णित राहिलेत. त्याचबरोबर या मैदानावर टीम इंडियाने आतापर्यंत ६ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी भारतीय संघाला (Indian Team) ४ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. फक्त २ सामने अनिर्णित राहिले. अशा स्थितीत टीम इंडियाला (Team India) विजय मिळवण्यासाठी अधिक घाम गाळण्याची गरज आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान.

दक्षिण आफ्रिका संघ:

डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, एडन मार्करम, विआन मुल्डर, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन, टोनी डी जोर्गी, डीन एल्गर (कर्णधार), मार्को जॅन्सन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा हप्ता लांबणीवर जाणार; जानेवारीत खात्यात ₹४५०० जमा होण्याची शक्यता

Panchag Today: आजचा दिवस बदल घडवणारा! या 4 राशींवर नशीब होणार मेहरबान

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Manikrao Kokate Arrest Update: माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रूग्णालयात, पण...

Maharashtra Politics : कल्याणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने घेतलं धनुष्यबाण हाती

SCROLL FOR NEXT