indian cricket team twitter
Sports

IND vs SA, Final: शाब्बास टीम इंडिया ! दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवून विश्वचषक जिंकला, रोहित-विराटचं द्रविडला गिफ्ट

India vs South Africa, T20 World Cup 2024: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाने आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ अखेर संपवला आहे. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात फलंदाजांची दमदार कामगिरी आणि गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १७७ धावा करायच्या होत्या. या धावांचा बचाव करताना भारतीय संघाने ७ धावांनी बाजी मारली.

दक्षिण आफ्रिकेकडून धावांचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉकने आक्रमक सुरुवात केली. त्याने ३१ चेंडूंचा सामना करत ३९ धावांची खेळी केली. तर रिजा हेंड्रिक्स ४ आणि कर्णधार एडेन मार्करम ४ धावा करत माघारी परतला. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्सने ३१ धावांचं योगदान दिलं. शेवटी हेनरिक क्लासेनने २७ चेंडूत ५२ धावा केल्या.

भारतीय संघाने केल्या १७६ धावा

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि अक्षर पटेल या दोघांनी महत्त्वपूर्ण भागीदारी केले आणि भारतीय संघाचे धावसंख्या 176 धावांवर पोहोचवली. सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला दुहेरी धक्का बसला. केशव महाराजने रोहित शर्मा आणि रिषभ पंतला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर अक्षर पटेल आणि विराट कोहलीने ७२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा ९, विराट कोहली ७६, रिषभ पंत ०, सूर्यकुमार यादव ३, अक्षर पटेल ४७ आणि शिवम दुबे २७ धावा करत माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi : फी न भरल्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्याला बसविले जमिनीवर; मुख्याध्यापकासह शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल

Home Appliances Deal: 'या' कंपनीने लाँच केली खास ऑफर! टीव्ही, फ्रिज, एसी फक्त १ रुपयांत घरी आणण्याची सुवर्णसंधी

Maharashtra Live News Update: मेगा ब्लॉकमुळे 'मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस' रद्द

Period Leave: नोकरदार महिलांसाठी गुड न्यूज, १२ दिवसांची मासिक पाळीची रजा मिळणार

HBD Rekha : ७१ व्या वर्षी तरुणींना लाजवेल असं सौंदर्य, रेखा यांच्या लांबसडक केसामागचं रहस्य काय?

SCROLL FOR NEXT