suryakumar yadav saam tv news
Sports

Suryakumar Yadav: सूर्या तापला, बसमध्ये कोणावर भडकला? Video तुफान व्हायरल

Suryakumar Yadav Viral Video: सूर्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय ज्यात तो संघातील खेळाडूवर नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहे.

Ankush Dhavre

Suryakumar Yadav Gets Angry:

नुकताच भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. ही मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादवने आपल्या तुफान फटकेबाजीने आणि उत्कृष्ट नेतृत्वाने सर्वांची मनं जिंकली आहेत.

या मालिकेत तो कुल दिसून आला. मात्र कुल सूर्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय ज्यात तो अर्शदीप सिंगवर नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, सूर्यकुमार यादव टीमबसमध्ये अर्शदीप सिंगवर रागावताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ एका क्रिकेट फॅनने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला.

अपलोड होताच हा व्हिडिओ तुफान व्हायरल होऊ लागला आहे. बसमध्ये काय घडलं काहीच माहिती नाही मात्र या तो अर्शदीप सिंगवर संताप व्यक्त करताना दिसून येत आहे. (Latest sports updates)

तिसऱ्या टी-२० सामन्यात अर्शदीपची सुमार कामगिरी..

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अर्शदीप सिंग महागडा ठरला होता. त्यामुळे सूर्यकुमार यादव अर्शदीप सिंगवर भडकला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. कारण हा व्हिडिओ तिसरा टी-२० सामना झाल्यानंतरचा आहे.

त्याच्या या सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २ षटकात १५.५० च्या सरासरीने ३१ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. त्याची २ षटकातील कामगिरी पाहून सूर्याने त्याला तिसरं षटक दिलं नव्हतं.

सूर्याचं शतक...

या मालिकेत सूर्याची बॅट चांगलीच तळपली. त्याने या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शतकी खेळी केली. हे त्याच्या टी-२० कारकिर्दीतील चौथे शतक ठरले आहे. तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

त्याने २ सामन्यांमध्ये ७८ च्या सरासरीने १५६ धावा केल्या आहेत. दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने तिसऱ्या सामन्यात शतक झळकावलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT