sanju samson twitter
क्रीडा

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने शानदार शतकी खेळी केली आहे.

Ankush Dhavre

Sanju Samson Century: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात संजू सॅमसन शो पाहायला मिळाला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाकडून संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच बँड वाजवली. या सामन्यातही त्याने शतक झळकावलं आहे. यासह त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

या सामन्यात एडन मार्करमने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी मैदानावर आली.

अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी परतला. मात्र संजूने आपली तुफान फटकेबाजी सुरुच ठेवली. सुरुवातीला त्याने २७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर ४७ चेंडूंमध्ये त्याने आपलं शतक पूर्ण केलं.

संजू सॅमसनने बागंलादेशविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात शानदार शतकी खेळी केली होती. या खेळीसह त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले होते. आता डरबनमध्येही संजू सॅमसन शो पाहायला मिळाला आहे.

संजू सॅमसन हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग २ शतकं झळकावणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कुठल्याही भारतीय फलंदाजाला हा कारनामा करता आला नव्हता. त्याने सुरुवात चांगली केली, पण हवा तसा शेवट करता आला नाही. त्याची खेळी १०७ धावांवर संपु्ष्टात आली.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघ: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, आवेश खान आणि वरुण चक्रवर्ती

दक्षिण आफ्रिका: रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सन, अँडिले सिमेलाने, जेराल्ड कोएटझी, केशव महाराज, नकबायोम्जी पीटर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 1st T20I: नाद करा पण आमचा कुठं! वर्ल्ड चॅम्पियन भारताचा दक्षिण आफ्रिकेला दणका

Supriya Sule Speech : पोर्शे कार अपघात प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

Champions Trophy 2025: टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार! या देशात होणार सामने

SCROLL FOR NEXT