virat kohli twitter
Sports

IND vs PAK: विराटचं शतक रोखण्यासाठी आफ्रिदीचा रडीचा डाव; पण माघार घेईल तो किंग कसला, पाहा PHOTO

Shaheen Afridi Bowled Wide To Virat Kohli: विराट कोहलीचं शतक रोखण्यासाठी शाहीन आफ्रिदीने रडीचा डाव केला. मात्र विराट कोहलीने हा डाव हाणून पाडला.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील हाय व्हॉल्टेज सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ गडी राखून धुव्वा उडवला आहे. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने ९९ टक्के सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

आता न्यूझीलंडने बांगलादेशला हरवलं, तर भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. पाकिस्तानला पराभूत करण्यात विराट कोहलीने मोलाची भूमिका बजावली. त्याने १११ चेंडूंचा सामना करत ७ चौकांराच्या साहाय्याने आपलं शतक पूर्ण केलं.

विराटचं शतक थांबवण्यासाठी पाकिस्तानने असा रचला सापळा

विराटने जेव्हा आव्हानाचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्यावेळी त्याने १-२ धावा घेत अर्धशतक पूर्ण केलं. ज्यावेळी तो शतकाच्या जवळ पोहोचला, त्यावेळी भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांनी त्याला शतकापासून रोखण्यासाठी नको ते कृत्य केलं. मात्र त्यांना आपल्या प्रयत्नात यश आलं नाही.

तर झाले असे की, भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर असताना ४२ वे षटक टाकण्यासाठी शाहीन आफ्रिदी गोलंदाजीला आला. त्यावेळी विराट ८७ धावांवर फलंदाजी करत होता. विराटला आपलं शतक पूर्ण करण्यासाठी १३ धावा करायच्या होत्या. तर भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठीही १३ धावा करायच्या होत्या.

शाहीन आफ्रिदीच्या त्या कृत्यामुळे फॅन्स संतापले

या सामन्यातील ४२ वे षटक टाकत असताना, शाहीन आफ्रिदीने एकापाठोपाठ एक ३ वाईड चेंडू टाकले. त्याने वाईड टाकताच दुबईत सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेट फॅन्सने चिडवायला सुरुवात केली.

यासह क्रिकेट फॅन्सने आफ्रीदीवर विराटला शतक करण्यापासून रोखण्यासाठी रडीचा डाव केल्याचा आरोप केला. असं सर्व असतानाही विराटने कॅल्क्यलेशन करुन खेळी सजवली आणि आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील ५१ वे शतक ठरले. यासह आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८२ वे शतक ठरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT